New Parliament : रजनीकांत-शाहरूखसह अक्षयने नव्या संसद भवनाच्या व्हिडिओला दिलं व्हॉईस ओव्हर
पुढारी ऑनलाईन डेस्क : नवीन संसद भवनाचा ( New Parliament ) लोकार्पण सोहळा आज ( दि. २८) पार पडला. दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत, शाहरूख खान आणि अक्षय कुमारसोबत अनेक बॉलिवूड कलाकारांनी नवीन संसद भवनाचे भरभरून कौतुक करत आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांनी नूतन संसद भवन वास्तूची माहिती देणार्या व्हिडिओला व्हॉईस ओव्हर दिला आहे. नव्या संसद भवनाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
रजनीकांत
साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांनी सेंगोलच्या माध्यमातून तामिळनाडूच्या जनतेचा सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. 'तामिळ सत्तेचे पारंपारिक प्रतीक असलेला राजदंड भारताच्या नवीन संसद भवनात चमकेल असे ते म्हणाले'
अक्षय कुमार
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने संसद भवनाचा एक व्हिडिओ शेअर केला असून त्यावर स्वतःच्या आवाजात व्हॉईस ओव्हर दिला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, 'नवीन संसद भवन पाहून मला वेगळाच आनंद झाला आहे. मला आठवते की, मी जेव्हा दिल्लीत आई-वडिलांसोबत राहत होतो, तेव्हा मी इंडिया गेट आणि त्याच्या आजूबाजूला जायचो. तेव्हा बहुतेक इमारती ब्रिटिशांनी बांधल्या होत्या. हे लोकशाहीचे मंदिर आहे. हीच नव्या भारताची ओळख आहे. आता देश प्रगती आणि विकासाने पुढे जात आहे. ही संसद पाहिल्यावर देश प्रगतीपथावर पोहोचत असल्याचे वाटते.'
अक्षयच्या ट्विटला रिट्विट करत पीएम मोदी म्हणाले की, 'तुम्ही तुमचे मत खूप चांगल्या प्रकारे व्यक्त केलं आहे. आपली नवी संसद ही आपल्या लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. हे देशाचा समृद्ध वारसा आणि भविष्यातील उत्साही आकांक्षा प्रतिबिंबित करते.'
शाहरुख खान
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने नव्या संसद भवनाचा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, 'जे लोक आपल्या संविधानाचे समर्थन करतात, या महान राष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधित्व करतात आणि त्याच्या वैयक्तिक लोकांच्या विविधतेचे रक्षण करतात, यासाठी हे किती छान नवीन भवन बनविले आहे. नवीन भारतासाठी नवीन संसद भवन पण भारताच्या अभिमानाचे जुने स्वप्न. जय हिंद! माझे संसद भवन माझा अभिमान.'
हेही वाचा :
- New Parliament Building Inauguration: धार्मिक पुजाविधीने संसदेच्या नवीन वास्तूचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; पंतप्रधानांनी व्यक्त केली कृतज्ञता
- New Parliament Building: लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या उजव्या बाजूला झाला 'सेंगोल' स्थापित
- Ram Charan : राम चरणची मोठी घोषणा, नव्या चित्रपटात निखिल सिद्धार्थ मुख्य भूमिकेत

