Ram Charan
Ram Charan

Ram Charan : राम चरणची मोठी घोषणा, नव्या चित्रपटात निखिल सिद्धार्थ मुख्य भूमिकेत

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'आरआरआर' च्या भरघोष कामगिरीनंतर साऊथ सुपरस्टार राम चरण ( Ram Charan ) त्याच्या आगामी 'द इंडिया हाऊस' बिंग प्रोजेक्टची घोषणा केली आहे. या चित्रपटासाठी त्याच्यासोबत दिग्दर्शक शंकर हे जोमाने कामाला लागले आहेत. तर अभिनेता निखिल सिद्धार्थ या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहे.

अभिनेता राम चरण ( Ram Charan ) यांनी सोशल मीडियावर टविट् करत आगामी 'द इंडिया हाऊस' या चित्रपटाची घोषणा केली आहे. यात त्यांनी लिहिले की. 'आमचे महान स्वातंत्र्य सेनानी वीर सावरकर गरू यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त आमचा संपूर्ण भारतात 'द इंडिया हाऊस' चित्रपटाची घोषणा करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. निखिल सिद्धार्थ, अनुपम खेर आणि दिग्दर्शक राम वामसी कृष्णा यांच्या प्रमुख भूमिका! जय हिंद!' यावरून राम चरण 'द इंडिया हाऊस' आगामी चित्रपटासाठी सज्ज झाल्याची माहिती मिळतेय.

याआधी हलकाशा एक व्हिडिओ शेअर करून याबबातची माहिती दिली होती. यानंतर राम चरण यांनी 'द इंडिया हाऊस' या चित्रपटाची अधिकृत्त घोषणा करण्यात आली आहे. राम चरणसोबत या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणी, निखिल सिद्धार्थ, अनुपम खेर यांच्या भूमिका असणार आहेत. 'आरआरआर' नंतर हा चित्रपट येणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news