

एखाद्या सेलेब्रिटीने फेसबुक आणि इन्सटाग्रामवर फोटो टाकली त्याची चर्चा ही होतेच. मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव याच कारणामुळे चर्चेत आलीय. दरम्यान सायली संजीवचे चेन्नईचा सलामीवीर पुणेकर ऋतुराज गायकवाड सोबत नाव जोडले जात आहे. सायली संजीवने इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यावर ऋतुराजने कमेंट केल्याने यावर जोरदार चर्चा सूरू झाली आहे. (sayali sanjeev)
दरम्यान ऋतुराज आणि सायलीच्या चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. सायली संजीवने काही तासांपुर्वी साडीतले फोटो शेअर केले आहेत. यावेळी नेटकऱ्यांनी तिच्या व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
एका नेटकऱ्यांने तर संजीवला थेट सल्लाच दिला आहे. ऋतुराज आला पुण्यामध्ये भेटलीस का तू असा थेट सल्ला देत ऋतुराजसोबत नेटकऱ्यांनी तिचे नाते जोडले आहे.
सायली संजीवच्या एका फोटोवर ऋतुराज गायकवाडने 'वोहहह' अशी कमेंट केली त्यावेळी पासून सायलीचे आणि ऋतुराज यांचे काहीतरी सुरू असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. यामुळे नेटकऱ्यांनी सायलीला ऋतुराजच्या मुद्दावरून चांगलाच गुळ पाडला आहे.
सायली संजीवने काहीं फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केल्यापासून सायलीच्या आणि ऋतुराजच्या चाहत्यांच्या कमेंट करायला सुरूवात केली आहे. ऋतू पुण्यात आल्यामूळे साडीवर पाहण्याचा कार्यक्रम उरकून घेतला वाटतं, Mrs. Gaikwad, ऋतु का राज, गायकवाड बाई, सायली ऋतुराज गायकवाड (पुणेकर), नमस्कार गायकवाड वहिनी काय म्हणता ? कशा आहात ? लवकर लाडू वाटा आता !! अशा कमेंट येवू लागल्या आहेत.
सायली संजीवने अल्पावधीतच कलाविश्वात आपली ओळख निर्माण केली आहे. तिने झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिची 'काहे दिया परदेस' मालिकेतील 'गौरी' ची भूमिका प्रेक्षकांना भावली होती. तिची 'शुभ मंगल ऑनलाईन' ही मालिका सुध्दा खूप गाजली.
सायलीने आतापर्यंत विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे. सायली सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती नेहमी वेगवेगळ्या अंदाजातील फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असते.