

पुढारी ऑनलाईन डेस्क : मॉडेल अभिनेत्री उर्फी जावेदला विवेक अग्निहोत्रीचे हे कमेंट अजिबात आवडलं नाही. (Urfi Javed) विवेक यांच्या कमेंटनंतर उर्फीने खरं-खोटं ऐकवत ट्विट केलं. उर्फी जावेदने लिहिलं- मला जाणून घ्यायचं आहे की, तुम्ही कोणत्या फॅशन स्कूलमधून पदवी घेतलीय? प्रकरण काय आहे, जाणून घेऊया. (Urfi Javed)
बॉलीवूडचे असे अनेक अभिनेते, गायक, अभिनेत्री, डान्सर आहेत, जे आपल्या विधानामुळे चर्चेत येतात. या यादीत प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे नावदेखील समाविष्ट आहे. विवेक यांनी कान्समधील ऐश्वर्याच्या कपड्यांवर कमेंट केली होती. त्यांनी ऐश्वर्याच्या फॅशन सेन्स आणि तिच्या आऊटफिटमध्ये तिला मदत करणाऱ्या 'कॉस्ट्यूम स्लेव्स'वर टीका केली होती. विवेक यांचे कमेंट उर्फी जावेदला अजिबात आवडलं नाही. तिने ट्विट करून चांगलेच प्रत्युत्तर दिलं.
उर्फी जावेदला विवेक अग्निहोत्रीचे हे कमंट अजिबात आवडले नाही. विवेकच्या कमेंटनंतर उर्फीने तिला खरे-खोटे ऐकवले. आपल्या ट्विटरवर पोस्ट करत उर्फी जावेदने लिहिलं- मला जाणून घ्यायचं आहे की, तुम्ही कोणत्या फॅशन स्कूलमधून आपली डिग्री घेतली आहे? तुम्हाला पाहून वाटतं की, तुम्हाला फॅशनविषयी अधिक ज्ञान आहे. तुम्हाल तर फॅशन मुव्ही बनवायचा पाहिजे.