NTR 30 : जान्हवीच्या एनटीआर ३० चित्रपटाचा फर्स्ट लूक आज रिलीज होणार

ntr 30
ntr 30
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरच्या आगामी 'एनटीआर 30' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. आता ट्विटरला जान्हवी कपूरच्या नावाचा ट्रेंड सुरु आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआरसोबत बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि सैफ अली खान देखील दिसणार आहेत. 'NTR 30' चित्रपटाचे शूटिंग आधीच सुरू झाले आहे. आता या चित्रपटाचा फर्स्ट लूक आज संध्याकाळी ७ वाजून २ मिनिटंनी  रिलीज होणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी जूनियर एनटीआरच्या 'एनटीआर 30' चित्रपटाचे नवे टायटल ठरवले आहे. त्याला 'देवरा' असे नाव देण्यात आले आहे. मात्र याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. तरी यामध्ये एक ट्विस्ट आहे की, रिपोर्टमध्ये असे सांगण्यात येत आहे की, ज्युनियर एनटीआरच्या चित्रपटाच्या टायटलची घोषणा त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 20 मे रोजी केली जाईल.

रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की 'NTR 30' चित्रपटाचे निर्माते सध्या त्याच्या प्रमोशनल कंटेंटवर काम करत आहेत. चित्रपटाचा लोगो, पोस्टर आणि टीझरवर काम सुरू आहे, जे लवकरच चाहत्यांसाठी शेअर केले जाईल. सध्या ज्युनियर एनटीआरचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचवेळी, चित्रपटात ज्युनियर एनटीआरसोबत जान्हवी कपूर आणि सैफ अली खानला पाहण्यासाठी अनेक लोक खूप उत्सुक आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news