Sanya Malhotra : कठलनंतर जवानमध्ये दिसणार सान्या, तिचा ७ वर्षांचा बॉलिवूड प्रवास काय म्हणतो? | पुढारी

Sanya Malhotra : कठलनंतर जवानमध्ये दिसणार सान्या, तिचा ७ वर्षांचा बॉलिवूड प्रवास काय म्हणतो?

पुढारी ऑनलाईन डेस्क : सान्या मल्होत्रा सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. (Sanya Malhotra) 2016 च्या स्पोर्ट्स ड्रामा ‘दंगल’मधून पदार्पण केल्यापासून तिने इंडस्ट्रीत खूप मोठा पल्ला गाठला आहे. कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या वास्तविक जीवनातील कथेवर आधारित नितेश तिवारी दिग्दर्शित चित्रपटाने मल्होत्राला प्रसिद्धीच्या झोतात आणले आणि बॉलीवूडमधील सर्वात यंग स्टर अभिनेत्री म्हणून तिने स्वतःची ओळख संपादन केली. (Sanya Malhotra)

दंगलमधील दमदार परफॉर्मन्सनंतर या अभिनेत्रीने अनेक दर्जेदार प्रोजेक्ट्स केले. LUDO, Pagglait मधील प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले. अभिनयाचं कौतुक होत असताना तिने आयुष्मान खुरानासोबत बधाई हो हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या हृदयावर सुपर हिट ठरला.

Sanya Malhotra
Sanya Malhotra

लव्ह हॉस्टेल, पटाखा, मीनाक्षी सुंदरेश्वर, हिट: द फर्स्ट केस, फोटोग्राफ, अशा अनेक प्रोजेक्ट्स मधून तिने प्रेक्षकांची मने जिंकली आणि आता ती कठल तिने चित्रपटात नव्या भूमिकेत आहे.

या चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत असणारी अभिनेत्री तिच्या व्यक्तिरेखेबद्दल अधिक बोलताना म्हणते ” पोलिसाची भूमिका साकारणे सोपे नव्हते, खरे सांगायचे तर. मला या व्यक्तिरेखेमध्ये उत्तम काम करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. माझी भूमिका चोख करण्याचा प्रयत्न करताना बर्‍याच गोष्टी. मला हे देखील आवडले की माझे पात्र ग्रामीण भारतीय वातावरणात महिला पोलिस कसे होते, जे सहसा पाहिले जात नाही. अभिनेत्री आणि कलाकार म्हणून ही भूमिका खूप शिकवून जाणारी होती.”

कठल चित्रपट अशोक मिश्रा यांनी लिहिला आहे आणि यशोवर्धन मिश्रा यांनी दिग्दर्शित केला आहे. आज १९ मे रोजी हा चित्रपट रिलीज झालाय. शाहरुख खान आणि नयनतारा, मिसेस, अभिनीत अॅक्शन चित्रपटात जवानमध्येही ती दिसणार आहे.

Back to top button