Avtaar-2 : लवकरच अवतार-२ ओटीटीवर; कुठे-कसा पाहता येणार? जाणून घ्या | पुढारी

Avtaar-2 : लवकरच अवतार-२ ओटीटीवर; कुठे-कसा पाहता येणार? जाणून घ्या

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतासह जगभरात गाजलेला अवतार-२ (Avtaar-2) हा चित्रपट लवकरच ओटीटी (OTT) वर प्रदर्शित होणार आहे. ‘अवतार-द वे ऑफ वॉटर’ या चित्रपटाने सिनेरसिकांच्या मनावर चांगलेच गारूड निर्माण केले होते. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट हिट ठरला होता. आता अवतार ओटीटीवर पाहता येईल. कुठे आणि कसा पाहता येईल, याविषयी जाणून घ्या.

हॉलीवूड (Hollywood) अॅक्टर जेम्स कॅमरूनने (James Cameroon) या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. मागील वर्षी डिसेंबरमध्ये हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला होता. आता हा चित्रपट ओटीटीवर देखील धुमाकुळ घालेल, अशी अपेक्षा सिनेरसिकांकडून व्यक्त होत आहे.

कोणताही चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर दोनच महिन्यांत ओटीटीवर प्रदर्शित होतो. मात्र, अवतार-२ दोन बऱ्याच उशिराने ओटीटीवर येतो आहे. या चित्रपटाची लहान वयोगटातील मुलांमध्येही चांगलीच क्रेझ पाहायला मिळतेय.

येत्या ७ जूनला हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होईल. या चित्रपटाला तुम्ही ‘Disney plus Hotstar’ वर पाहू शकता. दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या २०२४ मध्ये या चित्रपटाचा तिसरा भाग रिलीज होण्याची शक्यता आहे. भाग-२ जिथे संपला तिथून पुढील कहाणी अवतार-3 (Avtaar-3) मध्ये असणार आहे.

Back to top button