Astad Kale : कारण गुन्ह्याला माफी नाही मालिकेत आस्ताद नव्या भूमिकेत

आस्ताद काळे
आस्ताद काळे

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'कारण गुन्ह्याला माफी नाही' ही नवी थरारक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. (Astad Kale) या मालिकेत प्रेक्षकांचे आवडते इन्स्पेक्टर भोसले आणि जमदाडे आपल्याला निराळ्या अंदाजात पाहता येणार आहेत. निरनिराळ्या व्यक्तीरेखांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री अश्विनी कासार ही या मालिकेतून पुनरागमन करताना दिसणार आहे. (Astad Kale)

अभिनेत्री अश्विनी कासार पहिल्यांदाच पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. एसीपी अनुजा हवालदार असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव आहे. सोबतच रूपल नंद ही सुद्धा या मालिकेत पुनरागमन करताना दिसते आहे. मोहिनी दुभाषी असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव असणार आहे.

आता या मालिकेत एका नवीन व्यक्तिरेखेची एन्ट्री होणार आहे. आस्ताद काळे हा अभिनेता नेहमी निरनिराळ्या धाटणीच्या व्यक्तिरेखा साकारताना आपल्याला दिसतो. 'कारण गुन्ह्याला माफी नाही' या मालिकेत आस्ताद एका नेत्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सुहास साटम असे या नेत्याचे नाव असून आता मालिकेत त्याच्या येण्याने कथानक काय वेगळे वळण घेणार? भोसले आणि जमदाडे यांच्या कामात काय भर पडणार का ? हे पाहण्याजोगे असणार आहे.

'कारण गुन्ह्याला माफी नाही' मालिकेत कलाकारांची चांगली फळी प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. त्यात आता आस्ताद काळेच्या येण्याने मालिकेत एक वेगळी रंगत पाहायला मिळेल. एकापेक्षा एक वरचढ कलाकार एकाच वेळेला जेव्हा एकाच मालिकेत दिसतील, तेव्हा 'कारण गुन्ह्याला माफी नाही' या थरारक मालिकेत जे वेगळेपण येईल ते पाहणे प्रेक्षकांसाठी नक्कीच मजेशीर असेल.

लेखक चिन्मय मांडलेकर, दिग्दर्शक भीमराव मुडे आणि निर्माती मनवा नाईक यांचादेखील मालिकेसाठी हातभार लागला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news