Kareena Kapoor : फॅनला जवळसुद्धा येवू दिलं नाही, केलं इग्नोर अन्… (video) | पुढारी

Kareena Kapoor : फॅनला जवळसुद्धा येवू दिलं नाही, केलं इग्नोर अन्... (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ( Kareena Kapoor ) आणि अभिनेता सैफ अली खान नेहमी कोणत्या- कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्याच्यासह तैमुरची क्रेझ चाहत्याच्या आजही पाहायला मिळतेय. कपूर कुटूंबियांची एक झलक पाहण्यासाठी नेहमीच त्याचे फॅन्स उत्सुक असतात. दरम्यान करीना- सैफ मुंबईत डिनर डेटसाठी गेले होते. यावेळी कारमधून खाली उतरत असताना करीनाच्या एका माहिलेला हात लावायचा होता. मात्र, करीनाने तिचा हात लावून घेतला नाही. तिच्याकडे इग्नोर करत पुढे निघून गेली. या घटनेनंतर करीनाला नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ विरल भयानी इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.

करीना कपूर ( Kareena Kapoor ) आणि सैफ अली खान मुंबईमधील एका हॉटेलमध्ये डिनर डेटवर गेले होते. सुरूवातीला करीना आणि सैफ त्याच्या कारमधून खाली उतरून हॉटेलच्या दिशेने जात असतात. यावेळी अचानक एक महिला करीनाच्या जवळ येते आणि तिला ‘मला तूला हात लावू दे’ असे म्हणून ती तिला हात लावण्यासाठी पुढे सरसावते. यावेळी करीनाला तिला हात लावून बोलायचे असते. मात्र, ताबोडतोब बॉडीगार्डनी येवून त्या महिलेला बाजूला करतात. ही घटना लगेच घडल्याने करीनाना काय करावे हे सुचत नाही. यानंतर पुढे जावून करीनाने पाठीमागे त्या महिलेकडे वळून पाहिल्याचेही दिसते. शिवाय दोघांनी पुढे जावून पॉपाराझीच्या कॅमेऱ्याला पोझही दिली. यावेळी करीना येलो टॉपसोबत ब्लॅक पॅन्टमध्ये तर सैफ ग्रे कलरच्या टीशर्टमध्ये कॅज्युअल दिसला.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच नेटकऱ्यांनी करीनाला ट्रोल करत अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, ‘तुम्हाला हस्तांदोलन करायचे नसते तर तुम्ही नमस्ते केलं असतं तर चालले असते’, ‘इतका पैसा आणि प्रसिद्धीचा काय उपयोग की कोणाचाही आदर करू शकत नाही. उगाच कशाला त्या महिलेला इग्नोर केलं’. आणखी एका युजर्सने लिहिले की, ‘जर कोणीतरी मोठा स्टार असता तर असा हात झटकला नसता’… ‘आज कल लोकांच्यावर विश्वास नाही, ते काय करू शकतात?’, ‘त्यात त्यांचा दोष नाही. हे सामान्य आहे’. ‘तिने असं वागायला नको होतं.’ यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. या व्हिडिओला एका तासात ७२ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचा : 

(video : Viral Bhayani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button