The Kerala Story : अदा शर्मा तर ‘हिंदू शेरनी’, अभिनेत्रीने खुलं चॅलेंज दिल्यानंतर ट्विट व्हायरल

the kerala story
the kerala story

पुढारी ऑनलाईन डेस्क : द केरळ स्टोरीमध्ये शालिनी उन्नीकृष्णनची भूमिका साकारणाऱ्या अदा शर्माने (The Kerala Story ) सोशल मीडियावर लोकांना खुले आव्हान दिले आहे. चित्रपट रिलीज झाल्यापासून अदा शर्मा सतत चर्चेत आहे. तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. अदा शर्माने लोकांना विचारले आहे की, हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही इतके धाडसी आहात का? अदा शर्माच्या या पोस्टनंतर तिचे ट्विट व्हायरल होत आहे. अभिनेत्री अदा शर्माचे नेटकरी कौतुक करत आहेत. (The Kerala Story )

'द केरळ स्टोरी' या चित्रपटात अदा शर्मासोबत योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांच्याही भूमिका आहेत. विपुल अमृतलाल शाह यांचा हा चित्रपट सुदीप्तो सेन यांनी दिग्दर्शित केला आहे.

अदा शर्मा बनली 'हिंदू शेरनी'

'द केरळ स्टोरी' या चित्रपटात शालिनी उन्नीकृष्णनची भूमिका साकारून अदा शर्माने साकारली. तिच्या या पोस्टवर कमेंट करताना एका युजरने लिहिले, 'हिंदू शेरनी.' आणखी एका युजरने लिहिले की, जर दहशतवादाचा कोणताही धर्म नसतो तर एकाच धर्माच्या लोकांना या चित्रपटामुळे मिर्ची का लागत आहे.'

अदा शर्माने याआधीही या चित्रपटाविषयी एक दीर्घ पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये अदाने चित्रपटाला प्रोपगंडा म्हणणाऱ्या लोकांना ISIS आणि ब्राईड्स हे दोन शब्द गूगल सर्च करायला सांगितले होते.

शालिनी उन्नीकृष्णनची कहाणी

अदा शर्माने या चित्रपटात शालिनी उन्नीकृष्णनची भूमिका साकारली आहे, जी तिच्या आईची एकुलती एक मुलगी आहे. शालिनी उन्नीकृष्णन कशी काही लोकांच्या मोहात पडते आणि मुस्लिम धर्म स्वीकारून शालिनीपासून फातिमा बनते, असे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. घरापासून दूर हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींचे करिअर आणि अभ्यासासाठी कसे ब्रेनवॉश केले जाते आणि नंतर धर्मांतर करण्याची धमकी दिली जाते…त्यांचे काही वैयक्तिक व्हिडिओही बनवले जातात आणि ते व्हायरल करण्याची धमकी दिली जाते, असे यामध्ये दाखवण्यात आले आहे.

अधिक वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news