‘जिवाची होतिया काहिली’ मध्ये उषा नाईक भद्राक्काच्या भूमिकेत

जिवाची होतिया काहिली
जिवाची होतिया काहिली
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावरील ' जिवाची होतीया काहिली ' ही मालिका मराठी आणि कानडी यांच्यामधल्या प्रेमावर भाष्य करते आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत कोल्हापूरचा रांगडा गडी, अभिनेता राज हंचनाळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. तसेच प्रतीक्षा शिवणकर हिचा कानडी अंदाजसुद्धा प्रेक्षकांना आवडतो आहे. मराठी रांगडा गडी अर्जुन आणि कानडी भाषिक रेवथी यांची ही प्रेमकहाणी मालिकेत पाहायला मिळत आहे. सध्या मालिका रंगतदार वळणावर येऊन पोहोचली आहे. अर्जुन आणि रेवथी यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आहे. पण आता कार्तिकच्या येण्यामुळे मालिकेने वेगळे वळण घेतले असून अर्जुन आणि रेवथी यांच्या प्रेमात अडथळा पाहायला मिळतो आहे. दरम्यान मालिकेत एन्ट्री होणार आहे ती म्हणजे, 'भद्राक्का' ची.

भद्राक्काच्या भूमिकेत अभिनेत्री उषा नाईक यांचा दमदार अभिनय पाहायला मिळणार आहेत. उषा नाईक यांनी विविध चित्रपट आणि मालिकामधून आपल्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. आता एका वेगळ्या भूमिकेत त्या प्रेक्षकांसमोर येणार आहेत. भद्राक्का ही रेवथीच्या अप्पांची बहीण आहे. ती कोकटनूरांच्या घरी आल्यानंतर आप्पांचाही थरकाप उडाला आहे.

भद्राक्काच्या येण्याने वाड्यात कोणते नवीन वादळ येणार?, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे?. रेवथी आणि अर्जुन यांच्या आयुष्यात भद्राक्काच्या येण्याने काय बदल होतील?, हे पाहणे औक्युत्साचे ठरणार आहे. यातील भद्राक्काची वेशभूषाही वेगळी आहे. मराठी रांगडा गडी अर्जुन आणि कानडी भाषिक रेवथी यांच्या या प्रेमकहाणीमध्ये काही नवे आश्चर्यकारक बदल होतात का? यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहाचली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news