Oscar Deepika Padukone : दीपिका भावूक, राजामौली यांचा व्हिडिओही पाहा | पुढारी

Oscar Deepika Padukone : दीपिका भावूक, राजामौली यांचा व्हिडिओही पाहा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्कर २०२३ च्या सोहळ्यात दीपिका पदुकोणने व्यासपीठावर प्रेझेंटर म्हणून उपस्थिती लावली. (Oscar Deepika Padukone) यावेळी संपूर्ण सोहळ्यात टाळ्यांचा कडकडाट झाला. भाषण करता करता सातत्याने दीपिकाला थांबावे लागले. कारण होते, प्रेक्षकांनी दीपिकाच्या भाषणाला दिलेली दाद. (Oscar Deepika Padukone)

deepika ram

ऑस्कर २०२३ मध्ये भारतीयांचा बोलबाला राहिला आहे. एसएस राजामौलीचा चित्रपट ‘आरआरआर’च्या ‘नाटू नाटू’ गाण्याने ऑस्कर जिंकला आहे. बेस्ट ऑरिजनल सॉन्गचा ॲवॉर्ड या गाण्याने आपल्या नावे केला आहे. दुसरीकडे बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट मुव्ही कॅटेगरीमध्ये ‘द एलिफेंट व्हिस्पर्स’ने बाजी मारली. दरम्यान, सोशल मीडियावर काही व्हिडिओज पहायला मिळत आहेत. यामध्ये दीपिका पदुकोणच्या भाषणाचा एक व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पाहून अभिमान वाटेल. दरम्यान, प्रियांका चोप्राची पोस्टदेखील व्हायरल होत आहे.

दीपिका पादुकोणने ऑस्कर २०२३ च्या मंचावरून भाषण दिले. या भाषणात ती आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्याविषयी बोलताना दिसतेय. मध्ये मध्ये इतक्या टाळ्या वाजतात की, दीपिका भाषणावेळी अनेकदा थांबताना दिसते.

प्रियांका चोप्राची पोस्ट व्हायरल

लाईव परफॉर्मन्स पाहून प्रियांका चोप्रा खूप आनंद झाला. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आणि कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘अमेजिंग. आरआरआर. स्टँडिंग ओवेशन.

VIDEO- Rajamouli speech frm JumpCutTo twitter

 

Back to top button