Prarthna Behere | जेव्हा मराठी अभिनेत्री मोनोकिनी घालतात, बिघडतं कुठं? | पुढारी

Prarthna Behere | जेव्हा मराठी अभिनेत्री मोनोकिनी घालतात, बिघडतं कुठं?

स्वालिया शिकलगार : पुढारी ऑनलाईन डेस्क – बिकिनी वा मोनोकिनी घालून बोल्ड फोटोशूट करणं, हे काही नवीन गोष्ट राहिली नाहीये. तमाम कलाकार जेव्हा बोल्ड फोटोशूट करतात, तेव्हा त्यांची चर्चा होतचं राहते. चर्चेत येण्याचं हे एक माध्यम आहे, असं म्हटलं जातं. पण, एखाद्या मराठी (Prarthna Behere) अभिनेत्रीने असं काही केलं तर मात्र वेगळं घडतं. जणू काही तरी जगावेगळं केलं आहे, असं लोक बोलू लागतात. पण, जेव्हा मराठी अभिनेत्री बिकिनी, मोनोकिनी घालतात, तेव्हा बिघडतं कुठं? (Prarthna Behere)

नुकताच प्रार्थना बेहरेने मोनोकिनी बाथिंग सूटमध्ये हॉट फोटोशूट केल्याने तिची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होतेय. अनेक जण तिला संस्कृतीबद्दल बोलताना दिसत आहेत. तर चाहत्यांनी तिचे समर्थन केले आहे. काहींनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. ट्रोलिंग सामोरे जाणारी प्रार्थना ही पहिली अभिनेत्री नाही. ती एक मराठमोळी अभिनेत्री म्हणून तिला अशा प्रकारे टीकेला सामोरे जावे लागत आहे.

याआधी सई ताम्हणकर, पूजा सावंत, रसिका सुनील, शिकारी फेम नेहा खान या अभिनेत्रींचेही मोनोकिनी, बिकिनीतील फोटो सर्वांसमोर आले होते. मग, प्रार्थनाने केलं म्हणून काय बिघडलंय? उलटपक्षी, बॉलिवूड वा टॉलिवूडमध्ये अभिनेत्री मोनोकिनीमध्ये सर्रास दिसत असतात. तेव्हा त्यांचे गोडवे पाहायला मिळतातचं की!

सई लोकूर

मोनोकिनी ही बिकिनीसारखाचं प्रकार असतो. मोनोकिनीला वनपीस स्वीम वियर असेही म्हटले जाते. जगभरात मोनोकिनीला पसंती आहे. बाजारात अनेक प्रकारच्या मोनोकिनी, वेगवेगळ्या डिझाईन्स आणि रंगामध्ये उपलब्ध होते. अभिनेत्री हॉल्टर, त्रिकोणी, ब्राझिलियन, कटआऊट इत्यादी मोनोकिनी परिधान केलेल्या दिसतात. आतात तर नव्या फॅशन ट्रेंडनुसार बाथिंग सूट फ्रिल, कशीदाकारी मोनोकिनी, प्लीटेड मोनोकिनी, रफल्ड टॉप, साईड-कटआउट, प्रिंटेड मोनोकिनी सहज उपलब्ध होतात. त्यामुळेच जगभरात मोनोकिनीची मागणी इतकी आहे की, त्याचा पुरवठा अनेक इंडस्ट्री करतात. तुम्हाला त्या बाजारात सहजरित्या विकत घेता येतात.

रसिका सुनील

मोनोकिनीचा पहिला प्रकार हा बाथिंग सूट होता. रुडी गर्नेरिचने १९६४ मध्ये मोनोकिनी बनवली होती. पण, ती फॅशनसाठी नव्हती. असो.
मोनोकिनीमध्ये महिलांची बोल्ड काया दिसते. त्यालाच लोक ‘अंगप्रदर्शन’ असं म्हणतात. पण, मुळात अंगप्रदर्शन करणं ही संकल्पनाच वेगळी आहे. ती वेगवेगळ्या कारणांसाठी असू शकते. येथे बोल्ड फोटोशूट केलं, म्हणजे अंगप्रदर्शन केलं असा अर्थ होत नाही. किंवा यात अश्लिलता दिसण्यासारखे काहीचं नाही. मादक दिसणं या मोनोकिनीच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य आहे, असे म्हणता येईल. मोनोकिनी हे त्या-त्या अभिनेत्रीच्या किंवा महिलेच्या बाह्य सौंदर्यात भर टाकण्याचं काम करतं, असंही म्हणायला हरकत नाही.

रसिका सुनील

ज्या महिला बिकिनी परिधान करू शकत नाहीत, त्यांना मोनोकिनी एक उत्तम पर्याय आहे, असंही म्हटलं जातं. फॅशनच्या ट्रेंडमध्ये सातत्य ठेवणे, यासाठी एक उत्तम स्वीमसूट म्हणून मोनोकिनी वापरली जाते. जगभरातील फॅशन डिझायनर मोनोकिनीच्या विविधांगी फॅशनसाठी काम करताना दिसतात. मागणीनुसार, या मोनोकिनीचं स्ट्रक्चर स्टाईल बनवलं जातं. लोकप्रिय स्विमिंग सूट्सपैकी फुल-स्लीव्ह स्पोर्टी दिसणारी मोनोकिनी तर खासकरून अनेक दिवांसाठी बनवली जाते.

प्राजक्ता माळी

संकुचित विचार ठेवणारे मात्र आपल्या संस्कृतीबद्दल भरभरून बोलत असतात आणि लोक काय म्हणतील, हा प्रश्नचं मुळात मागे पडला आहे. त्यामुळे कितीही टीका झाली तरी उलट हा फॅशन ट्रेंड वाढत राहणार, हे एकूणचं बदलेल्या परिस्थितीतून दिसतं.

नेहा जोशी
सई ताम्हणकर

 

Back to top button