पुढारी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर लैंगिक छळाचा सामना करावा लागत आहे. टीकाकार सतत अश्लील कमेंट करत आहेत, अशी माहिती अभिनेत्री ऐश्वर्या भास्करन यांनी आपल्या मल्टी मॉमी या यूट्यूब चैनलवर दिली आहे. काही जणांवर लैंगिक शोषणाचे आरोप तिने केले आहेत.
ऐश्वर्या भास्करन है दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे. काही काळापूर्वी त्यांनी साबणाचा व्यवसाय सुरू केला. ग्राहक सहजपणे आपली ऑर्डर देऊ शकतील यासाठी त्यांनी आपला मोबाईल नंबर सोशल मीडियावर शेअर केला होता. आता त्या फोन नंबरवर देण्याऐवजी लोक त्यांना अश्लील मेसेज व फोटो पाठवत आहेत. असेच सुरू राहिल्यास या विरोधात कायदेशीर कारवाईही करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
इजमान, आरू आणि पंचराम या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. ऐश्वर्या भास्करन सध्या सिंगल आहेत. आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्यास त्या कमीही कचरत नाहीत.