Esha Gupta : ईशा गुप्ताचा टॉपलेस फोटो व्हायरल

Esha Gupta
Esha Gupta

अभिनेत्री आणि मॉडेल ईशा गुप्ता (Esha Gupta) पुन्हा एकदा तिच्या टॉपलेस फोटोमुळे चर्चेत आली आहे. सध्या बॉलिवूडपासून ईशा गुप्ता दूर असली तरी सोशल मीडियावर ती सक्रिय असते. तिचा फॅन फॉलोइंग मोठा आहे. यावेळी ईशाने तिचा एक टॉपलेस फोटो शेअर केला आहे. यात ती केवळ डेनिम जीन्समध्ये दिसून येत आहे. तिने हा फोटो बाल्कनीत उभा राहून काढला आहे. बाल्कनी समोर उंच डोंगर आणि जंगल दृष्टीस पडत आहे.

दरम्यान, ईशाने (Esha Gupta) हे फोटोशूट नेमके कुठे केले आहे याची माहिती दिलेली नाही. तिने तिचा टॉपलेस फोटो शेअर करत त्याला Love today Love tomorrow अशी कॅप्शन दिली आहे. ईशाचा हा फोटो पाहून चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनी हे कोणते ठिकाण अशी विचारणा केली आहे.

ईशी अखेरची 'नकाब' या वेब सीरीजमध्ये मल्लिका शेरावत आणि गौतम रोडे यांच्यासोबत दिसली होती. तिने याआधी एका ओटीटी शोच्या प्रमोशन दरम्यान तिच्या रंगावरुन बॉलिवूडमध्ये भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला होता. एका मुलाखतीत तिने म्हटले होते की 'जेव्हा मी बॉलिवूडमध्ये आली त्यावेळी काही स्टार्सनी मला म्हटले की तू मेकअप काळा करतेस. तू थोडा गोरा मेकअप करत जा. मला त्यांचे म्हणणे ऐकून धक्काच बसला. काही मेकअप आर्टिस्टनी माझा मेकअप गोरा करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना माझ्या संपूर्ण शरिराचा मेकअप करावा लागत होता. यामुळे मी एका जोकरसारखी दिसायची.'

ईशा बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने २००७ मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनल किताब जिंकला होता. तिने जन्नत २, राज ३ डी, चक्रव्युव्ह, गोरी तेरे प्यार मे, रुस्तम आदी चित्रपटांत तिने काम केले आहे.

हे ही वाचा :

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Gupta (@egupta)

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Gupta (@egupta)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news