पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारा ‘गेट टुगेदर’ चित्रपटाचा टीजर लाँच | पुढारी

पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारा 'गेट टुगेदर' चित्रपटाचा टीजर लाँच

पुढारी ऑनलाईन डेस्क : शालेय किंवा कॉलेज जीवनात एखाद्या मुलावर किंवा मुलीवर प्रेम असतं. पण काही ना काही कारणानं ते प्रेम यशस्वी होत नाही. या पहिल्या प्रेमाची पुन्हा आठवण करून देण्याचा प्रयत्न “गेट टुगेदर” या चित्रपटात करण्यात आला आहे. या चित्रपटाचा नॉस्टेल्जिक करणारा टीजर नुकताच लाँच करण्यात असून, उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. येत्या १९ मे पासून हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सतनाम फिल्म्स प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोंजारी, संजय गोंजारी, आशिष धोत्रे यांनी केली आहे. चित्रपटाची पटकथा, लेखन आणि दिग्दर्शन सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांचे आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलं असून सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन, जावेद अली गायिका आर्या आंबेकर, प्रियांका बर्वे यांनी चित्रपटातली सुमधुर गाणी गायली आहेत.

“देवमाणूस” या गाजलेल्या मालिकेतील एकनाथ गिते, अॅटमगिरी, वाघेऱ्या अशा चित्रपटात काम केलेली श्रेया पासलकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई या मालिकेतील त्रिशा कमलाकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. पावसाळी वातावरणात एकांतात असलेलं जोडपं टीजरमध्ये दिसतं आणि पहिल्या प्रेमाची आठवण करून देणाऱ्या संवाद ऐकू येतो. चित्रपटाचा टीजर रोमँटिक असल्यानं या चित्रपटाविषयी आता उत्सुकता वाढली आहे.

Back to top button
Rachin Ravindra : इंग्लिश गोलंदाजीची पिसे काढणारा रचिन रविंद्र आहे तरी कोण? Mouni Roy Birthday: तू माझं आयुष्य बदललं, दिशा पटानीच्या मौनीला अशाही शुभेच्छा टाईम बेबीसाठी रिताभरी चक्रवर्तीचा खास लूक Ganeshotsav 2023 : साजिऱ्या दगडूशेठ बाप्पांच्या स्वागताला लोटली पुण्यनगरी Prajakta Mali : ठरलं तर मग; Beautiful प्राजू ‘तीन अडकून सीताराम’ च्या प्रेमात सारं काही पोटासाठी ! गौतमीच्या या व्हायरल फोटोंची होते आहे चर्चा या सणांना Claasy दिसायचं आहे ? मानुषी छिल्लरचा हा लूक जरूर ट्राय करा Boho and backless : श्रीया पिळगावकरचा Bold अंदाज Saie Tamhankar : लाख सुंदर असतील पण तू लाखात एक आहेस सई पुलकित सम्राटच्या फॅशन स्टेटमेंटची चर्चा
हौसला भी तू… जूनून भी तू… मदर डे : दिग्गज अभिनेत्री आपल्या लाडक्या लेकीसोबत