Sukesh-Jackeline : महाठग सुकेशने तुरुंगातून लिहिले जॅकलिनला ‘लव्ह लेटर’ म्हणाला, मेरी बेबी… | पुढारी

Sukesh-Jackeline : महाठग सुकेशने तुरुंगातून लिहिले जॅकलिनला 'लव्ह लेटर' म्हणाला, मेरी बेबी...

पुढारी ऑनलाइन डेस्क : Sukesh -Jackeline : मनीलाँन्ड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात बंद असलेला ठकसेन अजूनही आपली प्रेयसी जॅकलीनवर प्रेम करतो. तुरुंगातून लव्ह लेटर लिहून तो वेळोवेळी आपले प्रेम व्यक्त करत असतो. सुकेश सोबतच्या प्रेमप्रकरणामुळे जॅकलीन देखील मनी लाँन्ड्रिंगच्या प्रकरणात अडकली होती. मात्र, नंतर तिला क्लिन चीट मिळाली. आता ईस्टर निमित्त सुकेशला तुरुंगात जॅकलीनची खूप आठवण येत आहे. त्यामुळे त्याने लव्ह लेटर लिहून ईस्टरच्या शुभेच्छा दिल्या आहे.

Sukesh-Jackeline : मेरी बेबी, मेरी बोम्मा… वाचा सुकेशचे प्रेमपत्र

सुकेशने ईस्टरनिमित्त जॅकलीनला खास संदेश पाठवला आहे. तो म्हणाला, “माझी बेबी, माझी बोम्मा, जॅकलिन हॅपी बेबी इस्टर. ही वर्षातील तुझ्या आवडत्या सुट्ट्यांपैकी एक आहे आणि तुला ‘इस्टर अंडी’ आवडतात.” संदेशात त्याने लिहिले आहे की तो तिची किती आठवण काढतो.

Sukesh-Jackeline : जॅकलिनच्या सौंदर्याची केली स्तुती…

सुकेशने जॅकलिनच्या सौंदर्यावर पत्रात भरभरून स्तुती केली आहे. तो म्हणाला, “माझी बेबी तुला माहित आहे का की तू किती सुंदर आहेस? या जगात तुझ्यापेक्षा सुंदर कोणी नाही. माझा ‘बनी ससा’. बेबी, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू आणि मी कायमचे एकत्र राहण्यासाठी बनलो आहोत. तू फक्त माझी नेहमीसाठी… “ही वेळ लवकरच निघून जाईल, असेही सुकेशने पत्रात लिहिले आहे. सुकेशने आपल्या पत्रात म्हटले आहे की, “जेव्हा मी ‘तू मिले, दिल खिले और जीने को क्या चाहिये’ या गाण्याची नवीन आवृत्ती ऐकली, तेव्हा मला तुझी आठवण येत होती.”, अशा शब्दात सुकेशने जॅकलीनची स्तुती करत आपले प्रेम व्यक्त केले आहे.

हे ही वाचा :

Conman Sukesh Chandrashekhar : महाठग सुकेश तुरुंगातून चालवत होता ‘खंडणी रॅकेट’; तुरुंग अधिकाऱ्यांना दिली कोट्यावधींची लाच

Jacqueline Fernandez: ‘तो माझ्या भावनांशी खेळला’; कोर्टात जॅकलीनने सुकेशविरोधात दिला जबाब

तुझ्यासाठी कोणत्‍याही थराला जाईन… माय लव्ह! तुरूंगातून सुकेशचे जॅकलिन फर्नांडिसला होळीच्या शुभेच्छांसह प्रेमपत्र

Back to top button