नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन : २०० कोटी रूपयांच्या मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये फसलेला महाठग सुकेश चंद्रशेखर सध्या दिल्लीच्या मंडोली जेलमध्ये बंदिस्त आहे. मात्र त्याचा जीव बॉलिवूड अभिनेत्री आणि श्रीलंकन मॉडेल जॅकलीनमध्ये गुंतला आहे. त्यामुळे त्याने जेलमधून जॅकलीन फर्नांडिसला पत्र लिहिले आहे. सुकेशने पत्रातून जॅकलिनला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने पत्रात जॅकलिनला एक चांगली व्यक्ती असल्याचे म्हटले आहे. तसचे त्याने जीवनातील गायब झालेले रंग पुन्हा आणण्याचे वचन दिले आहे. नुकतच सुकेश ज्या मंडोली जेलमध्ये आहे तेथील त्याच्या खोलीत पोलिसांनी छापेमारी केली, तेव्हा अनेक किंमती सामान जप्त करण्यात आले.
जॅकलिनला लिहिलेल्या पत्रात महाठग सुकेश चंद्रशेखर याने म्हटले आहे की, सर्वात अद्भुत व्यक्ती, आश्चर्यकारक आणि माझ्या सदाबहार जॅकलिनला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. रंगांच्या या उत्सवात मी तुम्हाला वचन देतो की, तुमच्या आयुष्यातून गायब झालेले किंवा फिके पडलेले रंग १०० पट परत येतील. मी निर्णय घेईन आणि ती माझी जबाबदारी आहे. सुकेशने पुढे लिहिले की, मी तुझ्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो हे तुला माहीत आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो माझी बेबी गर्ल. तू हसत रहा म्हणत पत्रात सुकेशने पुढे लिहिले की, तुला माहिती आहे की, तुम्ही माझ्यासाठी किती महत्वाच्या आहात. लव्ह यू माय प्रिन्सेस, मिस यू लॉट, माय बी, माझी बोम्मा, माय लव्ह आणि माय जॅकी.
या आधी 200 कोटी रूपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची चौकशी केली आहे. जॅकलिनशिवाय सुकेश नोरा फतेहीला महागडे गिफ्ट द्यायचा. सुकेशने जॅकलिन आणि तिच्या कुटुंबावर १० कोटी रुपये खर्च केल्याचे ईडीने सांगितले आहे. सुकेशवर तिचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोपही जॅकलिनने केला आहे. त्याचबरोबर या दोघांच्या नात्याबाबत अनेक प्रकारच्या गोष्टी मीडियामध्ये केल्या जातात.
हेही वाचा :