Urfi Javed : उर्फीचं काय चाललंय?; अतरंगी फॅशनवर चक्क मागितली माफी

Urfi Javed
Urfi Javed
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस फेम आणि अभिनेत्री उर्फी जावेद ( Urfi Javed ) तिच्या अंतरंगी फॅशन सेन्समुळे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या निरनिराळ्या फॅशनला नेटकरी वैतागले असतात. तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोलही केले आहे. याच दरम्यान उर्फीने ग्रीन कलरचा दोऱ्यांचा आउटफिट परिधान केला होता. यानंतर तिला नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी उर्फीने चक्क सोशल मीडियावर अंतरंगी फॅशनमुळे नेटकऱ्यांची माफी मागितली आहे.

अभिनेत्री उर्फी जावेद हिचा नवा लूक तिच्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळत आहे. ग्रीन कलरच्या जाळीदार ड्रेसमध्ये ती एकदम हॉट दिसली. यावेळी तिचा लूक चाहत्यांना अजिबात आवडला नाही. कारण, या लूमकमध्ये उर्फी अतिशय विचित्र, हिरव्या रंगाच्या बॅडमिंटन कोर्टच्या जाळ्यासारखी दिसत होती. हा तिचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होताच उर्फीच्या चाहत्यांनी तिला खडेबोल सुनावले.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने Kareena said she likes my confidence .My life is complete now ! K bye, someone pinch me. असे लिहिले आहे. यावेळी उर्फीने तिच्या केसांत गजरा घातला होता. कानात ग्रीन कलरच्या इअररिग्स, ग्रीन हाय हिल्स, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केला होता. हे फोटोला मिळालेल्या कॉमेन्टस पाहून उर्फीने ( Urfi Javed ) ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून चक्क चाहत्यांची माफी मागितली आहे.

उर्फी जावेदने तिच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'मी त्या सर्व चाहत्याची माफी मागते. कारण, माझ्या अंतरंगी फॅशन सेन्सेंन अनेकांचे मन दुखावले गेले आहे. आतापासून, तुम्हा सर्वांना बदललेली उर्फी दिसणार आहे. यासोबत उर्फीचा लूकही बदलेल. क्षमा.' उर्फीच्या या पोस्टमुळे चाहते आश्चर्य चकित झाले आहेत. कारण, नेहमी ती ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देणारी अभिनेत्री चक्क माफी मागते. दरम्यान काही नेटकऱ्यांना 'तिने खरोखरच तिचे बोल्ड कपडे सोडले आहेत का?', काहीतरी नवीन करण्यासाठी प्रमोशनल स्ट्रॅटेजी करत आहे काय?' असे अनेक प्रश्न विचारले आहेत.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news