Shehnaaz Gill : चाहत्यांनी शहनाजला असं काही केलं की सिक्युरिटी गार्डनी दिले धक्के (Video)

Shehnaaz Gill
Shehnaaz Gill

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बिग बॉस १३' नंतर शहनाज गिल (Shehnaaz Gill) ने आपलं ट्रान्सफर्मेशन केलं आहे. शहनाज गिल फॅट टू स्लिम झालीय. भोळी-भाबडी दिसणाऱ्या शहनाजने ग्लॅमरस स्टाईलने सर्वांनाच मागे टाकले आहे. तिचं चालणं-बोलणं आणि इंग्रजी बोलणं असं सर्व काही बदललं असलं तरी शहनाज तिचं आहे, जी पूर्वी होती. शहनाज स्वभाव अजिबात बदललेला नाही. याचा अनुभव एका प्रसंगी सर्वांनाच पाहायला मिळाला. (Shehnaaz Gill)

तिचा मासूम, भोळाभाबडा चेहरा पाहूनचं तिच्या प्रेमात अनेकजण आहेत. ती आपल्या चाहत्यांवर प्रेम देखील करते. याविषयीचा हा तिचा लेटेस्ट व्हिडिओ पुरावा म्हणून आहे, जो व्हायरल होत आहे. शहनाजच्या चाहत्यांनी असं काही केलं की, सिक्युरिटी गार्ड त्याला धक्का देऊ लागले.

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शहनाज गिल हॉटेलमध्ये लिफ्टजवळ येते, तेव्हा चाहते तिला चारी बाजूंनी घरतात. शहनाज खुश होते. सोबत फोटोजसाठी पोझ देत असते. तोपर्यंत सिक्युरिटी गार्ड येतात आणि फॅन्सना धक्का देतात. हा प्रकार पाहून शहनाज गिल स्वत: थांबवू शकत नाही ती सर्वांसमोर सिक्युरिटी गार्डची शाळा घेते.

शहनाज म्हणते-'प्रॉब्लेम काय आहे. पॅनिक का होत आहात. हे काय करायला आले आहेत. हे इकडे फोटोज क्लिक करायला आलेत जे प्रेम करतात, कमीत की त्यांना तर फोटोज क्लिक करू द्या.'

शहनाज गिलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शहनाजने ऑरेंज कलरचा ड्रेस घातला आहे. सोबत कोट घातला आहे. व्हिडिओम्ये तिच्या कानात गोल ईअरिंग्ज आणि केसांचा बन दिसतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news