शाहरुखसोबतच्‍या पाच चित्रपटातून ऐश्वर्याला मिळाला होता डच्‍चू! थ्रोबॅक व्हिडिओ चर्चेत | पुढारी

शाहरुखसोबतच्‍या पाच चित्रपटातून ऐश्वर्याला मिळाला होता डच्‍चू! थ्रोबॅक व्हिडिओ चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ( Aishwarya Rai ) एका थ्रोबॅक व्हिडिओमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. शाहरूख खानसोबत ती पाच चित्रपटांमध्‍ये काम करणार होती, मात्र, अचानक तिला या चित्रपटांमधून बाहेर काढण्‍यात आले, असा खुलासा तिने या व्‍हिडिओमधून केला आहे. या व्हिडिओमध्‍ये ऐश्वर्या ही सिमी ग्रेवालच्या एका शोमध्ये बोलताना दिसत आहे.

याचे उत्तर अजूनही माझ्‍याकडे नाही…

अभिनेत्री ऐश्वर्या राय ( Aishwarya Rai ) आणि सिमी ग्रेवाल याच्या थ्रोबॅक व्हिडिओ समोर आला आहे. यात सिमीने ऐश्वर्याच्‍या खासगी आयुष्याबाबत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहेत. यात सिमीने शाहरूख खानचे नाव घेत तुम्ही पाच चित्रपटांमध्ये एकत्रित काम करणार होता; मग असं काय घडलं की, त्यातून तुला बाहेर काढलं गेलं, असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना ऐश्वर्या हसत- हसत म्हणाली की, असे काही चित्रपट माझ्यासोबत होणार होते; पण अचानक त्यातून मी बाहेर कसे पडले याचे उत्तर अजूनही माझ्याकडे नाही.

चित्रपट सोडण्याचा निर्णय माझा नव्हता

यानंतर सिमीने पुढे विचारले की, हे चित्रपट सोडण्याचा निर्णय कोणाचा होता? यावर ऐश्वर्याने चित्रपट सोडण्याचा माझा निर्णय नव्हता. मलादेखील यावेळी धक्का बसला आणि मी दुखावले गेले. यावर सिमी म्हणते की, या अनुभवामुळे तुमची बॉलिवूडमध्ये काम करण्याची पद्धत बदलली आहे का?. यावर जे तुम्ही ऐकले आहे त्याबद्दल तुम्ही अधिक जागरूक व्हायला पाहिजे. परिस्थिती आणि लोकांवरील विश्वास यांचा प्रभाव पडतो. हे माझ्या बाबतीतही घडू शकते स्पष्ट झाले आहे.

यानंतर सिमीने ऐश्वर्याला विचारले की, याबाबत तू शाहरुख खानशी कधी बोलली का नाहीस?, कोणतं कारण होतं? आणि या चित्रपटांमधून का काढलं? असा प्रश्न करणे माझ्या स्वभावात नाही.’ असे ऐश्वर्याने म्हटले आहे. ऐश्वर्याचा हा व्हिडिओ बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये का गेली? याचा खुलासा केल्यानंतर व्हायरल होत आहे.

हेही वाचा : 

Back to top button