Samantha Ruth Prabhu : ‘ऊ अंटावा’ गाण्यावर सामंथा म्हणाली, घरच्यांनी… | पुढारी

Samantha Ruth Prabhu : 'ऊ अंटावा' गाण्यावर सामंथा म्हणाली, घरच्यांनी...

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू ( Samantha Ruth Prabhu )  ‘पुष्पा’ चित्रपटातील आयटम साँग ‘ऊ अंटावा’ ने प्रकाश झोतात आली. सामंथाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनयासोबत बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींच्या पैकी एक आहे. पुष्पा चित्रपटातील तिच्या आयटम साँगचे आजही चाहते कौतुक करताना थकत नाहीत. परंतु, सांमथाला ‘ऊ अंटावा’ गाण्याची ऑफर मिळाल्यानंतर कुटुंबियांसह अनेकांनी तिला नकार देण्याचा सल्ला दिल्याची माहिती समोर आली आहे.

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने ( Samantha Ruth Prabhu )  नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत वैयक्तिक आणि खासगी जीवनाशी संबंधित अनेक खुलासे करत ‘ऊ अंटावा’ या आयटम साँगसाठी खूपच संघर्ष करावा लागल्याची माहिती तिने दिली आहे. तिने म्हटलं आहे की, ‘ऊ अंटावा’ या आयटम साँगची तिला ऑफर मिळाली तेव्हा नुकतेच पती नागा चैतन्यपासून विभक्त झाली होती. यानंतर तिला बरेच जणांनी तुझा घटस्फोट झाला आहे, यामुळे तू बाहेर पडू शकत नाहीस, असे म्हटलं होतं. मात्र, माझ्या कुटुंबाने मला सपोर्ट केला. जवळचे हितचिंतक आणि काही नातेवाईकांनी तू आयटम साँग करू शकणार नाहीस, असे म्हटले होतं.

‘जे जवळचे मित्र मला नेहमी आव्हान स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करत होते. त्यानीही मला आयटम साँग करू नकोस असे सांगितले. यानंतर मी त्याना ठीक आहे, असे म्हणाले आणि पुढे मी गाणे शूट केले. गाणे हिट झाले. आजही चाहत्यांत त्या गाण्याची क्रेझ पाहायला मिळतेय. यानंतर माझ्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे, असेही सामंथाने मुलाखतीमध्‍ये सांगितले.

नागा चैतन्यच्या घटस्फोटोनंतर सांमथाने  या गाण्याला सहमती दर्शविली, कारण सामंथाने त्याचे नाते टिकवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला होता. मात्र, शेवटी त्यांना विभक्त व्हावे लागले. असेही ती म्हणाली.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

Back to top button