पुरुषांनी स्त्रियांशी कसे वागावे? शिक्षिकेने दिला विद्यार्थ्यांना 'धडा' : Viral Video | पुढारी

पुरुषांनी स्त्रियांशी कसे वागावे? शिक्षिकेने दिला विद्यार्थ्यांना 'धडा' : Viral Video

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावर दररोज विविध विषयांवरील व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. आता असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र हा थोडा वेगळा आहे. या व्हिडिओमध्ये एक शिक्षिका भाषणातून विद्यार्थ्यांला सूचना  करताना दिसत आहे. एका विद्यार्थिनीला तिच्या सहकारी वर्गमित्रांकडून दादागिरी केली जात होती, ते या इतिहासाच्या शिक्षिकेने पुरुषांनी स्त्रियांशी कसे वागावे? याविषयी सांगत असून, नेटकर्‍यांची या व्‍हिडिओ पसंती मिळताना दिसत आहे.

एक मर्यादा असावी…

 शिक्षिकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिक्षिकेचे नाव आहे बबिता असं आहे. एका विद्यार्थिनीला तिच्या सहकारी  वर्गमित्रांकडून दादागिरी केली जात होती, तेव्हा त्या विद्यार्थ्याला त्‍या सांगतात की,  “एक मर्यादा असावी… तुमच्या कुटुंबातील महिलांशी जशी वागणूक करता तशीच बाहेरील स्त्रियांशीही वर्तन करा.आपली आई,  बहिणी आणि महिला नातेवाईक, सभोवतालच्या महिलांना समान वागणूक द्या.”

मुलांनाही कसे वागावे हे शिकवले पाहिजे

एका जाहिरातीचे उदाहरण देत त्‍या सांगतात की, “वृद्ध महिलाही छेडछाडीपासून वाचत नाहीत. आपण  मुलींना वागायला जसे शिकवतो. तसचं आपण  मुलांनाही शिकवलं पाहिजे.आपल्यामुळे कोण दुखवणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असेही त्‍या स्‍पष्‍ट करतात.

बबिता यांचा व्हिडिओ ट्विटर युजर अंजली बी यांनी  शेअर केला आहे. या व्हिडिओला त्यांनी  कॅप्शन दिल आहे की,  “तिने तिच्या पद्धतीने, तिच्या वर्गातील मुलींचा आदर करण्याचा एक महत्त्वाचा धडा शिकवला आहे.” सोमवार २७ मार्चला शेअर केल्यापासून हा व्‍हिडीओ ट्विटरवर जवळपास 3 लाख वेळा पाहिली गेली आहे. एका युजरने म्हटलं आहे की,  “शिक्षक म्हणून त्यांनी दिलेला धडा खूप चांगला.” दुसर्‍या युजरने म्हटलं आहे की, “विचार खूप चांगले आहेत आणि दमदार भाषण, शाब्‍बास मॅडम, ती फक्त एक सामान्य शिक्षिका नाही तर एक गुरु आहे..तिने  सर्व काही साध्या पद्धतीने सांगितले ते मला आवडले.”

हेही वाचा 

 

Back to top button