Nawazuddin Siddiqui : अभिनेता नवाजुद्दीनचा पत्नीसह भावावर १०० कोटींचा मानहानीचा दावा | पुढारी

Nawazuddin Siddiqui : अभिनेता नवाजुद्दीनचा पत्नीसह भावावर १०० कोटींचा मानहानीचा दावा

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने ( Nawazuddin Siddiqui ) त्याचा भाऊ शमसुद्दीन आणि  पत्नी अंजना पांडे ऊर्फ ​​आलिया यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा केला आहे.  नुकसान भरपाई म्हणून १०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. नवाजुद्दीनचे वकील सुनील कुमार यांनी ही याचिका न्यायालयात दाखल केली असून यावर ३० मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

नवाजुद्दीनने ( Nawazuddin Siddiqui ) दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे की, ‘माझा भाऊ शमसुद्दीन आणि पहिली पत्नी ​​आलिया दोघांनी मिळून माझे नाव बदनाम करत आहेत. आलिया आणि मुलांचा मी छळ करत असल्याचे खोटे आरोप केले आहेत. हे सर्व खोटे आहे. याउलट मी त्याच्यासाठी खूप काही केले आहे. यांनतर दोघांनी माझे नाव बदनाम करणाऱ्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करू नयेत. तर दोघांनीही माझी लेखी माफी मागावी’ असे नवाजुद्दीने म्हटलं आहे.

तसेच माझी बदनामी केल्याने नुकसान भरपाई म्हणून १०० कोटी रूपयांची देण्याची मागणी केली आहे. याशिवाय त्याने भाऊ शमसुद्दीनवर पैशांचा गैरवापर आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. २००८ मध्ये नवाजुद्दीनने शमसुद्दीनवर विश्वास ठेवून पैशांशी संबंधित सर्व काम त्याच्याकडे सोपविली होते, मात्र, त्याने फसवणूक केली. त्यावेळी कामात बिझी असल्याने माझे याकडे लक्ष गेले नाही. दरम्यान, त्याने त्याच्या नावे मोठी प्रॉपर्टी खरेदी केली. या फसवणुकीबद्दल मी त्याच्याकडे चौकशी केली. मात्र, त्याने ठोस कारण दिले नाही. याशिवाय तो पत्नी आलियाला जावून मिळाला. आता दोघे मिळून माझी बदनामी करत आहेत. यामुळेच मी कोर्टात याचिका दाखल केली आहे. असेही त्यात म्हटलं आहे.

हेही वाचा : 

Back to top button