Jonathan Majors : गर्लफ्रेंडला मारहाण केल्याप्रकरणी अभिनेता जोनाथनला अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : मार्वल फेम अभिनेता जोनाथम मेजर्स ( Jonathan Majors ) याला गर्लफ्रेंडला मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, जोनाथमच्या टिमने तो निर्दोष असल्याचा दावा केला आहे.
रिपोर्टनुसार, न्यूयॉर्कमधील एका बारमधून जोनाथन आणि त्याची गर्लफ्रेंड घरी परत येत होते. जोनाथन मोबाईल फोनवरुन दुसऱ्या महिलेशी चॅट करताना दिसला. गर्लफ्रेंड त्याचा फोन तपासू लागली. याचा जोनाथनला राग आला. दोघांमध्ये भांडण झाले. जोनाथम याने गर्लफ्रेंडला मारहाण केली. तिच्या डोक्याला आणि चेहऱ्यावर दुखापत झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गर्लफ्रेंडच्या तक्रारीनंतर शनिवारी (दि. २५ मार्च) सकाळी मॅनहॅटन येथे जोनाथनला ( Jonathan Majors ) अटक करण्यात आली. यानंतर पोलिस त्याच्याकडे या प्रकरणाबाबत सखोल चौकशी करत आहेत. जोनाथनच्या हा निर्दोष असल्याचा दावा त्याच्या टीमने केला आहे.
हेही वाचा :
- Dhanush : अठरा वर्षांचा संसार मोडल्यावर धनुष पुन्हा चढणार बोहल्यावर
- Sara Ali Khan : साराला ‘आशिकी ३’ करायला आवडेल, पण…
- Amitabh Bachchan : बिग बीचें कामाचे वेळापत्रक तयार…
View this post on Instagram