Prajaktta Mali : पोस्ट ऑफीस उघडं आहे मालिकेत प्राजक्ताची एन्ट्री! | पुढारी

Prajaktta Mali : पोस्ट ऑफीस उघडं आहे मालिकेत प्राजक्ताची एन्ट्री!

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळी हे नाव कायमच आघाडीवर असते. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. (Prajaktta Mali) सुरुवातीच्या काळात काही मालिकांत काम करून प्राजक्ता घराघरांत पोहोचली. फक्त मालिकाच नव्हे तर मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याचंही स्वप्न तिने पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवलं. मालिका, चित्रपट, वेबसिरीज या तिन्ही माध्यमांमध्ये प्राजक्ता उत्तम काम करतेच, पण त्याबरोबरीनेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारीही तिनी उत्तमरीत्या पेलली आहे. (Prajaktta Mali)

आता प्राजक्ता माळी आपल्या चाहत्यांना आश्चर्यचकित करणार आहे. आता ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या मालिकेत तिची एन्ट्री होणार आहे. तब्बल ६ वर्षांनी ती मालिकेत पुनरागमन करते आहे. तिला मालिकेत पाहण्याची संधी मिळत असल्याने तिचा चाहतावर्ग नक्कीच खूश होणार आहे आणि तिच्या चाहत्यांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. पारगाव पोस्टात तिच्या येण्यामुळे काय धमाल होणार आहे, हे पाहणे रंगतदार ठरेल.

पोस्टात संगणक येण्याने आधीच सर्वांच्या कामात गोंधळ निर्माण झाले आहेत. त्यात आता पोस्टात नवीन एन्ट्री झाल्यामुळे आणखीन काय पाहायला मिळणार, हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by PrajaktaRaj (@prajaktarajsaaj)

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

Back to top button