Burn Marks Remove Tips : भाजल्यानंतर डाग राहू नये म्हणून करा 'हे' घरगुती उपाय | पुढारी

Burn Marks Remove Tips : भाजल्यानंतर डाग राहू नये म्हणून करा 'हे' घरगुती उपाय

पुढारी ऑनलाईन डेस्क : कधी आपल्याला असे भाजते की, त्याचे डाग शरीरावर राहून जातात. कधी कधी जखमेचे व्रण किंवा जखमेचे डाग जात नाहीत. तेल उडून पडलेला डाग तर सहजासहजी जात नाही. विशेषकरून स्वयंपाक करताना महिलांना खूप सारे चटके बसतात. (Burn Marks Remove Tips ) तव्याचा, भांड्यांचा चटका तर कधी पदार्थ तळताना तेलाचे थेंब शरीरावर उडतात. काळजी घेतली नाही तर हे भाजलेले डाग तसेच राहून जातात. तर भाजल्यानंतर तुम्हाला तत्काळ काही घरगुती उपाय करता येतील, ज्याच्यामुळे तुमचे भाजलेले छोटे डाग शरीरावर राहणार नाहीत किंवा ते कमी होण्यास मदत होईल. (Burn Marks Remove Tips )

Burn Marks Remove Tips : कोरफड –

कोरफड केवळ केसांनाच नाही तर त्वचेसाठीही उपयुक्त आहे. शरीराला थंडावा देणारे कोरफड तुम्ही ज्यूस बनवून देखील पिऊ शकता. कोरफडमध्ये औषधी गुणधर्म असतात. यामधील अँटीऑक्सिडंटमुळे कोरफडीचा उपाय केला जातो. रोज भाजलेल्या ठिकाणी कोरफड लावावा, काही दिवसात डाग विरळ होतील.

Burn Marks Remove Tips : चंदन –

शीतलता प्रदान करणारे चंदन होय. चंदनाची पावडर दुधात घालून पेस्ट बनवावी. ती भाजलेल्या डागांवर लावावी, डाग विरळ होण्यास मदत होईल.

तुळस
तुळस

तुळस –

भाजलेल्या डागांवर तुळशीच्या पानांचा रस फार उपयुक्त आहे. पानांचा रस काढून तो डागांवर लावणे, फायदेशीर ठरते.

मध –

भाजलेले डाग नाहीसे करण्यासाठी मध उपयुक्त आहे. शुद्ध मधाचा वापर करून ते लिंबूत मिसळावे, ते डागेवर लावल्यास उपयुक्त ठरेल.

हळद –

दही आणि हळदीचे मिश्रण करून डागांवर लावावे. हळदमध्ये अँटी बॅक्टेरिअल गुण असतात. हळद ब्लिचिंगचे काम करत असते.

खोबरेल तेल –

भाजल्याबरोबर शुद्ध खोबरेल तेल लावलं तरी चालते. खोबरेल तेलामुळे शक्यतो डाग राहत नाहीत. या तेलामुळे जखमेवरील दाह आणि खाज कमी होते. खोबरेल तेल आणि मध एकत्र करून डागांवर लावले तरी गडद डाग हलके होण्यास मदत होईल.

Back to top button