Swara Bhasker reception : लहेंग्यात वलीमाचे फोटोज शेअर करत ट्रोलर्सना उत्तर | पुढारी

Swara Bhasker reception : लहेंग्यात वलीमाचे फोटोज शेअर करत ट्रोलर्सना उत्तर

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री स्वरा भास्करने आपल्या वलीमा (रिसेप्शन) मध्ये पाकिस्तानी डिझायनरचा लहेंगा परिधान केला होता. स्वराने रिसेप्शन पार्टीतील काही फोटो शेअर केले आहेत. तिने पाकिस्तानी डिझायनरचे आभारदेखील मानले आहेत.

१९ मार्चला को फहादच्या गावी होमटाऊन बरेलीमध्ये आणखी एक रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. यामध्ये तिचे जवळचे मित्र आणि नातेवाईक सहभागी झाले होते. दुसऱ्या रिसेप्शन पार्टीत स्वराच्या लहेंग्यावरून सोशल मीडियावर चर्चा रंगली. कारण कंट्रोवर्सी क्वीनने आपल्या वेडिंग रिसेप्शनमध्ये पाकिस्तानी डिझायनरचा लहेंगा घातला होता.

स्वराने या कपड्यांसोबत हेवी ज्वेलरी घातली होती. हे फोटोज शेअर करत अभिनेत्री स्वराने कॅप्शनमध्ये लिहिलंय, “माझ्या वलीमेचं आउटफिट, जो लाहौरहून आधी दुबई मग बॉम्बे मग दिल्ली आणि अखेर बरेली पोहोचलं. मी अली जीशानच्या प्रतिभेने अचंबित आहे. जेव्हा मी त्यांना फोन करून सांगितले की, मला तुम्ही काम केलेले कपडे रिसेप्शनसाठी हवे आहेत. तेव्हा त्यांचा उत्साह आणि उदारता पाहून मला त्यांचे कौतुक करावेसे वाटते.

Back to top button