Hina Khan : रमजानआधी ‘उमराह’साठी हिना पोहोचली मक्कामध्ये (Photos)

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान ( Hina Khan ) तिच्या वैयक्तिक जीवनातील अपडेट्स शेअर करून सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनसायोबत तिच्या एका पेक्षा एक हॉट फोटोंनीही ती चर्चेत असते. एवढेच नाही तर हिना तिचा बॉयफ्रेंड रॉकीसोबत अनेकवेळा स्पॉट झाली होती. आता हिना तिचा पहिला उमराह यात्रेसाठी मक्का मदिना येथे पोहोचली आहे.
अभिनेत्री हिना खानने ( Hina Khan ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करून कुटुंबियांसह उमराह यात्रेला जात असल्याची माहिती दिली आहे. यावेळी फोटोमध्ये हिना खान व्हाईट रंगाच्या सूटसोबत हिजाब परिधान केलेला दिसते. हिना एका खुर्चीत बसलेली एकदम ग्लॅमरस दिसतेय. तर ती प्रवासादरम्यान निवांत विमानात बसली असून तिच्यासोबत तिची आईदेखील व्हाईट रंगाच्या कुर्तामध्ये दिसतेय.
हिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर स्टोरीवरदेखील हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘मी माझा पहिला उमराह यात्रा करण्यासाठी पुढे जात आहे.’ असे लिहिले आहे. याशिवाय तिने जेद्दा ते मक्कादरम्यानचा जातानाचा एक किस्सा देखील शेअर केला आहे.
यंदाचा २३ मार्च २०२३ पासून रमजानचा पवित्र महिना सुरू होत आहे. रमजानसाठी अनेक बॉलिवूड कलाकारांनी तयारी जोरदार सुरू केली आहे. दरम्यान हिनादेखील रमजानसाठी मक्काला जात आहे. हा तिचा फोटो चाहत्यांना खूप पसंतीस उतरला आहे. हिनाच्या आधी सना खान, गौहर खान, जन्नत जुबैर, फैसल शेख, दीपिका कक्कडची मेहुणी सबा इब्राहिम यांनीही मक्केत उमराह यात्रा केली होती. यासोबत हिना फिटनेसबद्दल जागरुक असून ती जिम वर्कआउटचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
हेही वाचा :
- Salman Khan : ईदला सलमान भेटू शकणार नाही चाहत्यांना?
- Sai Tamhankar : सांगलीच्या सई ताम्हणकरला ‘मराठी पाऊल पडते पुढे’ पुरस्कार
- Taapsee Pannu : तापसीला देवीची प्रतिमा असलेले दागिने घालणे पडले भारी
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram