लग्‍न केव्‍हा करणार ? प्रश्‍नावर मलायकाचे उत्तर "प्री हनीमून..." | पुढारी

लग्‍न केव्‍हा करणार ? प्रश्‍नावर मलायकाचे उत्तर "प्री हनीमून..."

पुढारी ऑनलाईन : बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika) ही डान्स आणि फिटनेससाठी ओळखली नेहमी चर्चेत असते. आपल्‍या प्रोफेशनल जीवनशैलीसोबतच मलायकाची पर्सनल जीवनशैली देखील नेहमी चर्चेत असते. मलायका आणि अरबाज खान हे 2016 पासून वेगळे झाले. त्‍यानंतर ती अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आली. अर्जुन-मलायकाची (Malaika- Arjun) जोडी तीच्या चाहत्यांना खूप आवडते आणि चाहते त्‍यांच्या लग्नाबद्दल तीला नेहमी सोशल मिडीयावर प्रश्न विचारत असतात.

मलायकाने तिच्या लग्नाच्या प्रश्नावर म्‍हणाली, आम्‍ही प्री-हनिमून एन्जॉय करत आहे, असे ती म्‍हणाली. (Malaika- Arjun) दोघेही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांबद्‌दल प्रेमाचा वर्षाव करतात. दोघांनी लवकरात लवकर लग्न करावे अशी त्‍यांच्या चाहत्‍यांना वाटते.  मलायका अरोराने याबाबत सांगितले की, मला लग्नाची घाई नाही. सध्या आम्‍ही दोघे प्री-हनिमूनचा आनंद घेत आहोत.

ताे आत्मविश्वास आणि सुरक्षितता देतो…

मलायका आणि अर्जुन (Malaika- Arjun) त्यांच्या नात्याबद्दल नेहमी बोलतात सोशल मिडीयावर बोलत असतात. मलायका म्हणाली, आम्हाला आमचे भविष्य एकत्र बघायचे आहे. आम्‍ही याबद्दल नेहमी खूप बोलत असतो. कोणतेही नाते सुरक्षित राहणे महत्वाचे असते. अर्जुनसोबत मी आनंदी आहे. तो नेहमी आत्मविश्वास देतो. असे मलायका म्‍हणाली.

हेही वाचा

Tunisha Sharma Case : मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटी ‘का’ संपवत आहेत जीवन?

केवळ विक्रम गोखलेच नाही तर मनोरंजन क्षेत्रातील या सेलिब्रिटींना आपण यावर्षी गमावलं

मनोरंजन : जगाची दुनियादारी

 

 

Back to top button