Swara Bhasker : स्वराच्या रिसेप्शनला राहुल गांधींची हजेरी; अखिलेश यादवांसह बडे नेते उपस्थित

Swara Bhasker
Swara Bhasker

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ( Swara Bhasker ) आणि समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमद यांची दिल्लीत रिसेप्शन पार्टी झाली. लग्नाच्या धमाकेदार रिसेप्शन पार्टीला बॉलिवूड कलाकारांसोबत राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. खासकरून या पार्टीत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उपस्थिती दर्शविली. या पार्टीचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सामाजिक व राजकीय घडामोडींवरील प्रखड मत मांडणारी आणि बेधडक अभिनेत्री स्वरा भास्करने ( Swara Bhasker ) नुकतेच फहाद अहमदसोबत लग्न बंधनात अडकली. या लग्नाची रिसेप्शन पार्टी मोठ्या उत्साहात दिल्लीत पार पडली. यावेळी स्वरा फ्लोरल गुलाबी लहेंग्यात सुंदर दिसली. तर फहाद व्हाईट शेरवानीमध्ये हॅडसम दिसला. या पार्टीला खास करून काँग्रेस खासदार राहुल गांधी हजेरी लावत नवदाम्पत्याला भरभरून आशिर्वाद दिला. तर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, जया बच्चन याच्यासह बॉलिवूड कलाकारांनी उपस्थिती लावली होती. या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी नवदाप्त्याचे भरभरून कौतुक केलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी स्वराला ट्रोलदेखील केलं आहे. दरम्यान एका युजर्सने 'टुकडे टुकडे गॅंगचे लोक एकत्र आले आहेत', 'याचा अर्थ असा होतो की, शाहीनबाग आणि जेएनयूला यांचा पाठिंबा आहे' यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहे. स्वराने ट्विटरवर १६ फेब्रुवारी २०२३ रोजी फहाद अहमदसोबत लग्नाची अधिकृत घोषणा केली. याआधी दोघांनी कोर्ट मॅरेज केलं होतं.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news