Ram Charan : रेड कार्पेटवर आम्ही गेलो, ऑस्कर मिळवला याचा अभिमान | पुढारी

Ram Charan : रेड कार्पेटवर आम्ही गेलो, ऑस्कर मिळवला याचा अभिमान

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ अभिनेता रामचरण मायभूमीत परतला. दिल्ली विमानतळावर पोहोचताच त्याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधल. यावेळी तो म्हणाला, मी खूप आनंदी आहे. प्रत्येकाचे आभार. आम्हाला एम एम किरवानी, एस एस राजामौली आणि चंद्राबोस यांचा अभिमान वाटतो. कारण, त्यांची प्रचंड मेहनत, आम्ही रेड कार्पेट पोहोचलो आणि भारतासाठी ऑस्कर मिळवला.

मी सर्व चाहत्यांचे आभार मानतो. भारतात उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम चाहत्यांनी आरआरआर चित्रपट पाहिला आणि नाटू नटू गाणे सुपरहिट झाले. नाटू नाटू फक्त आमचे गाणे नाही तर भारतातील लोकांचे गाणे आहे. त्यामुळे आम्हाला ऑस्करसाठी संधी मिळाली, असेही रामचरणने नमूद केले.

Back to top button