Ouch 2 Film : विवाहबाह्य संबंधाचा विनोदी एन्ड दाखवणारी शॉर्टफिल्म (Video) | पुढारी

Ouch 2 Film : विवाहबाह्य संबंधाचा विनोदी एन्ड दाखवणारी शॉर्टफिल्म (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क :वैभव मुथा दिग्दर्शित ‘आऊच २’ नावाचा लघुपट प्रदर्शित झाला. शीतल भाटिया यांनी निर्मिती केलेल्या या १५ मिनिटांच्या चित्रपटात एक फसवणूक करणाऱ्या सुदीपची कहाणी आहे. (Ouch 2 Film ) ही भूमिका शर्मन जोशीने साकारलीय. कथेत एक विनोदी संयोगात उघड करण्यात आले आहे. त्याची पत्नी दीपू म्हणून, निधि बिष्त हिने आणि गर्लफ्रेंड तान्या म्हणून, शेफाली जरीवाला हिने भूमिका साकारलीय. हा चित्रपट, एक विशिष्ट विवाहबाह्य संबंधाचा अंत कसा होतो, या विषयावर एक विलक्षण विनोद आहे. (Ouch 2 Film )

मुंबईतील रात्री उशिरा रात्रीची पार्श्वभूमी असलेला, ‘आऊच २’ ही, टू टायमिंग (विवाहबाह्य संबंधा) वर एक सावधगिरीची कथा आहे. या चित्रपटाची सुरुवात, एका इश्कबाज सुदीप आणि त्याची गर्लफ्रेंड तान्या हे दोघे कामावरून घरी परत येत असतात. तो तिला घरी सोडल्यानंतर, सुदीप गुपचूप तान्याला फोन करतो. परंतु, जेव्हा त्याची पत्नी त्यादरम्यान कॉल करते आणि त्याला पुन्हा उशीर झाल्याबद्दल तक्रार करते, तेव्हा तो नाराज होतो. तान्यासोबतचा कॉल अद्यापही होल्डवर असतो. तो पत्नी दीपूसोबतच्या कॉलवर रागारागाने बोलत असतो. गाडी चालवताना फोनवर बोलल्याबद्दल त्याला पोलिस अडवतात. त्याला हे समजण्यापूर्वी, ते दोन कॉल विलीन (मर्ज) होतात आणि सुदीपच्या विवाहबाह्य संबंधाचा उलगडा होतो.

Ouch 2 Film
Ouch 2 Film

या शॉर्ट फिल्मबद्दल बोलताना अभिनेता शर्मन जोशी म्हणाला, “मला वाटते की, केवळ १५ मिनिटांत ‘आऊच २’ने विनोदी पद्धतीने विवाहबाह्य संबंधाचे कथानक ज्या प्रकारे प्रकट केले, ते आश्चर्यकारक आहे. वैभव मुथा यांनी खूप चांगले काम केले आहे.

अभिनेत्री निधि बिष्त पुढे म्हणाली, “मी नेहमीच शॉर्ट फिल्म्सच्या पद्धतीची; 15 -20 मिनिटांच्या कालावधीत सांगण्यात आलेली एक संपूर्ण कथेची, कल्पना केली आहे. मला स्क्रिप्ट आवडली. मला आशा आहे की, प्रेक्षकांना हा चित्रपट बघताना तितकाच आनंद होईल, जितका आनंद आम्हाला तो बनवताना आला होता!”

अभिनेत्री शेफाली जरीवाला हिने सांगितले की, “हा विवाहबाह्य संबंधावर एक विनोद आहे. दिग्दर्शक आणि कलाकारांनी हा चित्रपट बनवताना खूप मेहनत घेतली आहे. लोकांना हा चित्रपट कसा वाटतो हे जाणून घेण्यास मी खूप उत्सुक आहे.”

लेखक आणि दिग्दर्शक वैभव मुथा म्हणाले, “विवाहबाह्य संबंध प्रकरणे आणि कार्यालयीन रोमान्सच्या कथा सामान्य आहेत. पण, अपारंपरिक वळणासह या प्लॉट्सना पुन्हा प्रस्तुत करण्याचा आव्हानात मला खरोखर आनंद प्राप्त होतो.”

Back to top button