Aman Dhaliwal : 'जोधा अकबर’ फेम अमन धालिवालवर चाकू हल्ला | पुढारी

Aman Dhaliwal : 'जोधा अकबर’ फेम अमन धालिवालवर चाकू हल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये जिममध्ये वर्कआऊट करताना ‘जोधा अकबर’ फेम अभिनेता अमन धालिवालवर ( Aman Dhaliwal ) एका अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केला आहे. या हल्यात त्याला दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना कॅलिफोर्नियातील ग्रँड ऑक्स परिसरात बुधवारी घडली आहे. हल्ला करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मात्र, त्याने हल्ला का केला? यांची अद्याप माहिती मिळालेली नाही.

पंजाबी अभिनेता अमन धालिवाल ( Aman Dhaliwal ) हा कॅलिफोर्नियातील ग्रँड ऑक्स परिसरातील एका जिममध्ये वर्कआऊट करण्यासाठी गेला होता. यादरम्यान जिममध्ये त्याच्यावर अचानक एका व्यक्तीने कुऱ्हाड आणि चाकूच्या सहाय्याने वार केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत अमनने हल्ला करणाऱ्या व्यक्तीला धरून ठेवल्याचे दिसते. ‘मला पाणी द्या, मला पाण्याची गरज आहे, तुम्ही माझा फायदा घेवू शकत नाही.’ असेही तो म्हणताना दिसत आहे.

दोघांच्या झटापटीतदरम्यान हल्ला करणाऱ्या व्यक्तीला अमन जोरात खाली ढकलतो आणि तेवढ्यात जिममधील अनेक लोक आणि सुरक्षा रक्षक त्याच्या मदतीला येतात. यानंतर सगळ्यांनी ह्ल्लेखोरांला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान अमन जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी रूग्णाल्यात दाखल केले आहे.

अमन धालिवाल हा प्रसिद्ध पंजाबी अभिनेता आहे. अमनने मॉडेलिंगपासून त्याच्या करिअरची सुरुवात केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांच्या ‘जोधा अकबर’ या चित्रपटात त्याने मुख्य भूमिका साकारलीय.

हेही वाचा : 

Back to top button