Karanji Recipe : कुरकुरीत करंजी कशी कराल?  | पुढारी

Karanji Recipe : कुरकुरीत करंजी कशी कराल? 

पुढारी ऑनलाईन डेस्क : सणासुदीचे दिवस सुरू झाले की, स्पेशल रेसिपी बनवणं हा एक रिवाज आहे. प्रत्येक सणाची काही स्पेशल रेसिपी असते. त्यात दिवाळी हा महत्वाचा सण आहे. कारण, या सणामध्ये अनेक रेसिपी असतात. लाडू, चिवडा, करंजी (Karanji Recipe), चकली, शंकरपाळी, कापण्या, शेव, अनारसे, बाकरवडी अशा अनेर रेसिपींची मेजवाणीच असते. दिवाळीच्या सणानिमित्त आपण काही स्पेशल रेसिपी पाहणार आहोत. त्यातील आज महाराष्ट्रातील खास ‘कंरजी’ची रेसिपी (Karanji Recipe) पाहुया…

Karanji Recipe

साहित्य 

१) एक वाटी खोबऱ्याचा कीस

२) एक वाटी तीळ भाजून कीस

३) एक वाटी पिठीसाखर

४) आवडीनुसार काजू-बदामाचे

५) थोडी वेलची पावडर

६) एक वाटी रवा

७) दोन टेबल स्पून डालडा

८) चिमूटभर मीठ

९) तळण्यासाठी तेल

१०)  मैदा

Karanji Recipe

कृती 

१) मैद्यामध्ये सोईनुसार पाणी घालून मळून घ्या. मळलेले पीठ १५ मिनिटं भिजत ठेवा.

२) रव्यामध्ये मीठ घाला आणि कडकडीत गरम केलेला डालडा घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.

३) खोबऱ्याचा, तिळाचा, पिठीसाखरेचा आणि कापलेले काजू-बदाम, यांचं एकत्रित मिश्रण करून त्याचे सारण करून ठेवा.

४) मळलेल्या पिठाचे छोटे-छोटे गोळे करून त्याचे पुरीच्या आकाराने लाटून घ्या. करंजीच्या साच्यामध्ये लाटलेले पीठ घाला आणि त्यात करंजीचे सारण घाला.

५) कढईवर तेल गरम करून घ्या आणि एक-एक करंजी तळून घ्या. अशाप्रकारे तुमची कुरकुरीत करंजी तयार झाली आहे.

पहा व्हिडिओ : बटाटा वड्यात आला कसा ?

या रेसिपी वाचल्यात का? 

Back to top button