दीपिकाच्या टॅटूने वेधले लक्ष | पुढारी

दीपिकाच्या टॅटूने वेधले लक्ष

ऑस्कर सोहळ्याचे यंदाचे 95 वे वर्ष होते. लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये हा सोहळा दिमाखात पार पडला. यंदाचा हा सोहळा भारतीयांसाठी सर्वच अर्थाने विशेष ठरला. कारण 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताला दोन श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे. या सोहळ्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या टॅटूने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यावेळी दीपिकाने काळ्या रंगाचा छान गाऊन घातला होता. त्याबरोबर तिने गळ्यात एक नाजूक नेकलेसही घातला होता. दीपिकाचे ऑस्कर सोहळ्यातील या लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दीपिकाने इन्स्टाग्रामवर ऑस्कर सोहळ्याच्या या लूकचे फोटो शेअर केले आहेत. तिच्या कानामागे असलेल्या टॅटूने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. दीपिकाने स्वत:च्या ब्रँडच्या नावाचा टॅटू केला आहे. यात ‘82.ई’ असे लिहिले आहे. दीपिकाने काही महिन्यांपूर्वी एक ब्युटी ब्रँड सुरू केला आहे. याचे नाव ‘82.ई’ असे ठेवले आहे. त्याचाच टॅटू तिने तिच्या कानाच्या मागे काढला आहे.

Back to top button