Alia Bhatt – आहा…!

Alia Bhatt – आहा…!
Published on: 
Updated on: 

95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताला दोन श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे. एस. एस. राजामौली दिग्दर्शित 'आरआरआर' या चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला बेस्ट ओरिजिनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. तर बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या 'द एलिफंट व्हिस्पर्स'ने बाजी मारली आहे. या यशाबद्दल अभिनेत्री आलिया भट्ट हिने आनंद व्यक्त केला आहे. आलियाने 'आरआरआर' या चित्रपटात छोटीशी, पण महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत नाटू नाटू गाण्याला ऑस्कर मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. आलियाने नाटू नाटू गाण्याला ऑस्कर मिळाला आहे, असे सांगणारे एक पोस्टर शेअर केले आणि लिहिले, आहा..! तसेच तिने सेलिब्रेशन करणारे इमोजीही पोस्ट केले. तिची ही स्टोरी सध्या चर्चेत आहे. नाटू नाटू हे गाणे चंद्रबोस यांनी लिहिले आहे. तर एम.एम. किरवानी यांनी या गाण्याचे संगीत दिग्दर्शन केले आहे. नाटू नाटू या गाण्यातील राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या नृत्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. प्रेम रक्षित याने या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. या गाण्यातील सिग्नेचर स्टेप ही आयकॉनिक ठरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news