अनन्याचे आदित्यशी अफेअर? | पुढारी

अनन्याचे आदित्यशी अफेअर?

काही महिन्यांपासून बी टाऊनमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरच्या अफेअरच्या बातम्या जोरात आहेत. सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये अनन्या आणि आदित्य स्पॉट झाले होते. त्यावेळेपासूनच त्यांच्या अफेअरची चर्चा सुरू आहे. त्यानंतर अनन्याने आदित्यच्या ‘द नाईट मॅनेजर’ या वेबसीरिजच्या प्रीमियरलाही हजेरी लावली होती. आता त्या दोघांनी लॅक्मे फॅशन विकमध्ये एकत्र वॉक केल्याने या दोघांच्या नात्याची पुन्हा चर्चा होत आहे. लॅक्मे फॅशन विकच्या ग्रँड फिनालेमध्ये अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. या ग्रँड फिनालेमध्ये अनन्या आणि आदित्यही दिसले. दोघेही मनीष मल्होत्राचे शो स्टॉपर होते. त्यांनी एकत्र वॉक केला आणि पोज दिल्या. या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आदित्य काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे तर अनन्याने हाय स्लिट ड्रेस घातला होता. आदित्य आणि अनन्या बर्‍याच दिवसांपासून बॉलीवूडच्या अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र दिसत आहेत. मात्र, दोघांनी अद्याप आपल्या नात्याबाबत काहीच भाष्य केलेले नाही.

Back to top button