HBD Amir Khan :कॉलेज बॉय तर कधी ३ मुलांचा बाप, आमिरला जमतं कसं? | पुढारी

HBD Amir Khan :कॉलेज बॉय तर कधी ३ मुलांचा बाप, आमिरला जमतं कसं?

पुढारी ऑनलाईन डेस्क : वयाची साठी गाठत आलेल्या आमिर खानला पाहिल्यानंतर कुणालाही विश्वास बसणार नाही की, त्याने पन्नाशी ओलांडलीय. मिस्टर परफेक्टनिस्ट आज ५८ वर्षांचा झाला आहे. पण, त्याच्याकडे पाहून असं वायतयं की, त्याने वयाला रोखून धरलं आहे. वाढत्या वयाचा कोणताही परिणाम त्याच्यावर होताना दिसत नाही. आपल्या अभिनयामुले आणि लुक्समुळे सर्वांना वेड लावणाऱ्या आमिरने आतापर्यंत अनेक भूमिका साकारल्या, वेगवेगळी पात्र साकारताना तो त्या त्या भूमिकांमध्ये परफेक्ट बसला. (HBD Amir Khan) त्याचा पहिला चित्रपट होता- ‘कयामत से कयामत तक’. तेव्हा तो चॉकलेट बॉय नावाने ओळखला जायचा. तेव्हापासून आजतागायत त्याच्या लूक्समध्ये खूप ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे. (HBD Amir Khan)

‘कयामत से कमायत तक’ हा रोमँटिक चित्रपट त्याने केलाय. पुढे दिल है की मानता नहीं, रंगीला, राजा हिंदुस्तानी अशा चित्रपटांमध्ये तो एक रोमँटिक हिरो म्हणून सर्वांसमोर आला.

अधिक रोमँटिक चित्रपट केल्यांमुळे त्याची इमेज चॉकलेटी बॉय अशी झाली होती. जसजशी त्याने वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची निवड केली, तसतसा त्याच्या लूक्समध्ये एकदम वेगळं ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळालं. ‘सरफोश’मध्ये तो वेगळ्या लूकमध्ये दिसला. ज्याच्यामुळे त्याची चॉकलेटी बॉयची इमेजदेखील संपुष्टात येताना दिसली.

लगान, गजनी, मंगल पांडे, दंगल, तारे जमीं पर, थ्री इडियट्स, पीके, धूम या प्रत्येक चित्रपटातील त्याचा लूक वाखाणण्याजोगे होता. हे चित्रपट केल्यानंतर आमिरने सिद्ध केलं की, तो चॉकलेटी बॉयपेक्षा एक परफेक्ट आणखी उत्तम हिरो आहे. तो वर्षात एकच चित्रपट करतो, पण प्रचंड मेहनतीने तो यशस्वी बनवतो.

प्रचंड मेहनतीचं फळ ट्रान्सफॉर्मेशन

वजन वाढवणे असो, सिक्स पॅक ॲब्ज करणे असो वा वजन कमी करून कॉलेज कुमार दिसणे हे मिस्टर परफेक्शनिस्टला तंतोतंत जुळतं. आमिर खानला आपले वाढलेले वजन कसे कमी करायचे चांगले माहितीये. म्हणूनचं तर तो मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणून ओळखला जातो.

हवी तशी शरीरयष्टी बनवण्यासठी रात्रं-दिवस वर्कआऊट हेच आमिरचे गणित आहे. आमिर खान स्वत:ला फिट आणि हेल्दी ठेवण्यासाठी वर्कआऊटदेखील करतो. हेल्दी डाएटमुळे त्याची हेल्दी स्किन राहते. शरीरासाठी संतुलित आहार घेणे आणि आपल्या खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष देणे हेच त्याचे तरुण दिसण्यापाठीमागील रहस्य आहे.

Back to top button