Deepika Padukone : ‘तू झुठी मै मक्कार’ साठी दीपिकाचा नकार; कारण आलं समोर | पुढारी

Deepika Padukone : 'तू झुठी मै मक्कार' साठी दीपिकाचा नकार; कारण आलं समोर

पुढारी ऑनलाईन : रणबीर कपूर बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. नुकताच त्याचा ‘तू झुठी मै मक्कार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यात त्याने पहिल्यांदा श्रद्धा कपूरबरोबर काम केले आहे. मात्र, या चित्रपटात श्रद्धाऐवजी रणबीरची एक्स गर्लफ्रेंड काम करणार होती. मात्र, तिने नकार दिला. रणबीर चित्रपटांप्रमाणे त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत येत असतो. दीपिकाला ( Deepika Padukone ) ही भूमिका विचारण्यात आली होती, मात्र तिने नकार दिला.

चित्रपटाच्या दिग्दर्शकावर मी- टू चे आरोप करण्यात आले होते म्हणून दीपिकाने ( Deepika Padukone ) ‘तू झुठी मै मक्कार’ हा चित्रपट करण्यास नकार दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी १५.७३ कोटींचा गल्ला जमवला आहे. होळी आणि धुळवडीच्या सुट्ट्यांचा या चित्रपटाला चांगलाच फायदा झाला आहे. रणबीर आणि श्रद्धाबरोबरच या चित्रपटात डिंपल कपाडिया, बोनी कपूर आणि सिंग बस्सी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अभिनेता म्हणून बोनी कपूर यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.

Back to top button