सस्पेन्स थ्रिलर ‘शातिर THE BEGINNING’ लवकरच भेटीला | पुढारी

सस्पेन्स थ्रिलर 'शातिर THE BEGINNING' लवकरच भेटीला

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीयांस आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्यावतीने एका हटके विषयावरील चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘शातिर THE BEGINNING’ असे या आगामी मराठी चित्रपटाचे नाव आहे. चित्रपटाची कथा- सुनील वायकर आणि हेमंत एदलाबादकर यांची आहे. तर पटकथा आणि दिग्दर्शन सुनील वायकर यांनी केले आहे. त्यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. रेश्मा वायकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

‘शातिर THE BEGINNING’ या चित्रपटाची कथा कॉलेजमध्ये घडलेल्या एका खळबळजनक घटनेवर आधारित असून चित्रपटाचे चित्रीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. चित्रपटाला रोहित नागभिडे यांचे संगीत लाभले आहे. गीतकर वैभव देशमुख यांच्या गीतांना वैशाली सामंत, शाल्मली खोलगडे यांचा स्वरसाज आहे. ‘शातिर THE BEGINNING’ या चित्रपटात मराठीत आणि बॉलीवूड मधील दिग्गज कलाकारांसह काही नवोदित कलाकार सुद्धा महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. परंतु त्यांची नावे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना अजून काही दिवस वाट पहावी लागणार आहे.

Back to top button