रौंदळ चित्रपट : पहिल्या वीकेंडला ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला

roundal movie
roundal movie
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेला 'रौंदळ' हा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट अखेर रसिकांच्या भेटीला आला आहे. लक्षवेधी टिझर आणि ट्रेलरसोबतच या चित्रपटातील सुमधूर गीतरचनांनी 'रौंदळ' येण्यापूर्वीच सर्वांच्या मनात कुतूहल जागवलं होतं. त्यामुळे तिकिटबारीवर गर्दी केलेल्या प्रेक्षकांनी फर्स्ट डे फर्स्ट शोपासूनच 'रौंदळ' पाहण्यासाठी गर्दी केली. शुक्रवारी चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच झालेलं अॅडव्हान्स बुकिंग आणि नंतर झालेल्या करंट बुकींगच्या बळावर या चित्रपटानं पहिल्या वीकेंडला चांगला गल्ला जमवत मागील काही दिवसांपासून मराठी चित्रपटांची सुरू असलेली यशस्वी घोडदौड अबाधित राखण्याच्या कामी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील प्रेक्षक 'रौंदळ'वर अक्षरशः फिदा झाले आहेत.

रवींद्र औटी, संतोष औटी, कैलाश गुंजाळ आणि संजय कुंजीर या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. 'रौंदळ'चं दिग्दर्शन गजानन नाना पडोळ यांनी केलं आहे. भाऊसाहेब शिंदे आणि नेहा सोनावणे या नव्या कोऱ्या जोडीनं प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलं आहे. संजय लाकडे, यशराज डिंबाळे, सुरेखा डिंबाळे, शिवराज वाळवेकर, गणेश देशमुख, सागर लोखंडे या कलाकारांनी 'रौंदळ'मध्ये अभिनय केला आहे.

शुक्रवार, शनिवार आणि रविवारी या चित्रपटाने ५ कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. एकूण ३२० चित्रपटगृहांमध्ये रिलीज झालेला 'रौंदळ' ८९० शोजसह सुरू आहे. हर्षित अभिराज यांचे संगीत आहे. 'मन बहरलं…', 'ढगानं आभाळ…' या गाण्यासोबतच 'भलरी…' हे शेतीवरील गाणं रुंजी घालतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news