सामंथा हीने नागा चैतन्याकडून नाकारली २०० कोटी रुपयांची पोटगी?

सामंथा हीने नागा चैतन्याकडून नाकारली २०० कोटी रुपयांची पोटगी?
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : बऱ्याच दिवसांपासून साऊथचा सुपरस्टार नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि त्याची पत्नी अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हे एकमेकांपासून विभक्त होणार असल्याच्या बातम्या माध्यमांतून फिरत होत्या. गेले काही महिने सोशल मीडियावर सामंथा आणि नागा चैतन्य यांच्यात काही आलबेल नसल्याच्या चर्चा होतच होत्या.

अखेर या दोघांच्या विभक्त होण्याच्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालं. समांथा आणि नागा चैतन्यने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत विभक्त होत असल्याचे त्यांनी जाहीर केलं. लग्नाच्या जवळपास चार वर्षांनंतर समांथा आणि नागा चैतन्य हे दोघे विभक्त होत आहेत.

घटस्पोटाच्या निर्णयाने सामंथाचे चाहते दुखावले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सामंथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटानंतर अक्किनेनी कुटुंबाकडून सामंथाला पोटगी देण्यात येत होती. तिला अक्किनेनी कुटुंबाने तब्बल २०० कोटी रुपयांची पोटगी देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु, सामंथाने ही पोटगी घेण्यास नकार दिला आहे. सामंथा एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. सामंथाने तिच्या अभिनयाच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण केलं. आपल्याला पोटगीची गरज नसल्याच तीने सांगितले आहे.

एवढचं नव्हे तर समांथाने या पोटगीला नकार दिल्याचं देखील अक्किनेनी कुटुंबाला कळवलं आहे. बराच विचार केल्यानंतर समांथाने या पोटगीला नकार दिला असून तिला नागा चैतन्यच्या कुटुंबियांकडून एक रुपया देखील नको असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. समांथाने तिच्या अभिनयाच्या जोरावर टॉलिवूडमध्ये मोठ्या मेहनतीने आणि जिद्दीने स्वत:च स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे तिला या घटस्फोटाच्या आधारावर कोणत्याही प्रकारे पैशांची गरज नाही.

समांथा सध्या तिच्या खासगी आयुष्यापेक्षा कामावर अधिक लक्ष केंद्रित करत असल्याचे समांथाच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तिच्या खासगी आयुष्यामुळे तिच्या कोणत्याही प्रोजेक्टवर परिणाम होवू नये अशी समंथाची इच्छा आहे. ती खूप प्रोफेशनल आहे.

तिने सांगितले की मी फक्त प्रेमासाठी नागा चैतन्यासोबत लग्न केल आहे. आयुष्यभर एकमेकांची साथ देण्यासाठी लग्नची गाठ बांधली होती परंतु, आता चित्र पूर्ण बदललं आहे. आपल्याला त्याच्या कुटुंबाकडून पैसे नको असल्याचं सामंथाने स्पष्ट केलं आहे. तिचे चाहते ही या निर्णयाचं कौतुक करत आहेत. सामंथा ही खऱ्या अर्थाने स्वतःच्या पायावर उभी आहे. तिच्यासाठी पैसे महत्वाचे असते तर तिने घटस्फोट घेतला नसता असं म्हणत चाहत्यानी सामंथाचं कौतुक केलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news