Sai Pallavi : अल्लू अर्जुन-रश्मिकाच्या ‘पुष्पा २’ मध्ये धुमाकूळ घालणार साई

Sai Pallavi
Sai Pallavi

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुष्पा आणि पुष्पातील गाणी अद्यापही रसिकांच्या ओठांवर आहेत. अल्लू अर्जुन – रश्मिका मंदाना यांच्या अभिनयाचे तर खूप कौतुक झाले. (Sai Pallavi ) आता पुष्पाच्या दुसऱ्या भागाची चर्चा होतेय. यादरम्यान, पुष्पा संदर्भात मोठी अपडेट समोर येतेय. रिपोर्टनुसार, या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीची एन्ट्री होणार आहे. (Sai Pallavi )

अभिनेत्री साई पल्लवी अलिकडेच गार्गी चित्रपटामध्ये दिसली होती. आता पुष्पा चित्रपटाचा पुढचा भाग पुष्पा : द रुलमध्ये साई जिसमार असल्याची माहिती समोर येतेय. आता पुष्पाचे निर्माते अधिकृत घोषणा कधी करणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

allu arjun
allu arjun

साई अभिनेता फहाद फाजील याच्यासोबत दिसणार असून तिचा कॅमियो रोल असल्याचे म्हटले जात आहे.

साईचे चाहते तिला पुष्पामध्ये पाहण्यास उत्सुक आहेत. सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करून चाहत्यांनी कौतुक केले आहे. एका युजरने लिहिले- जर हे सत्य असेल तर खरचं उत्सुकता आहे. आणखी एकाने लिहिले- अल्लु अर्जुन आणि साई पल्लवी यांचा डान्स नंबर पाहायला आवडेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news