College Romance: कॉलेज रोमान्समध्ये अश्लिलता, आक्षेपार्ह भाषा..हायकोर्ट म्हणाले… | पुढारी

College Romance: कॉलेज रोमान्समध्ये अश्लिलता, आक्षेपार्ह भाषा..हायकोर्ट म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : यूट्यूब चॅनेल टीव्हीएफची वेब सीरीज (College Romance) कॉलेज रोमान्स जेव्हापासून रिलीज झालीय, तेव्हापासून सीरीजची चर्चा होतेय. या सीरीजमध्ये अर्वाच्य भाषेचा वापर केला गेला आहे. त्यामुळे या सीरीजच्या कलाकार आणि निर्मात्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले होते. यानंतर कलाकारांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. (College Romance) याप्रकरणाबाबत दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती काय म्हणाले पहा-

याप्रकरणी सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी म्हटले की, ही सीरीज पाहण्यासाठी मला ईअरफोनचा वापर करावा लागला होता. सीरीजमध्ये खूप अधिक अर्वाच्य भाषेचा वापर करण्यात आला आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना हे ऐकवू शकत नाही. कारण, जो कुणी ऐकेल, तो अचंबित होईल.

न्यायमूर्ती म्हणाले, अशा भाषाने युवकांचे डोके खराब होईल. भारतातील तरुणांसाठी अशी भाषा योग्य नाही. अशी भाषा आपल्या व्यवहारात आणि सामान्यांमध्ये वापरली जात नाही. निर्णय देताना कोर्टाने सांगितले की, ही सीरीज अद्याप यूट्यूबवर आहे. आणि लोक ते पाहत असतील. याप्रकरणी कडक पावले उचलण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहेत.

या सीरीजच्या पाचव्या एपिसोडमध्ये अर्वाच्य भाषा वापरण्यात आलीय. तरुणींसाठी अयोग्य शब्द आणि ते चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहेत. २०१९ मध्ये या सीरीजचे कलाकार आणि निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले होते. एफआयआर दाखल केल्याचे योग्यच असल्याचे हायकोर्टाने सांगितले.

Back to top button