Bholaa Trailer : लढाई धैर्याने जिंकली जाते तर…; अजयच्या ‘भोला’ चा ट्रेलर रिलीज (video)

Bholaa
Bholaa
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि तब्बूचा आगामी 'भोला' चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 'भोला' चित्रपटातील एक रोमॉन्टिक गाणं ( नजर लग जायेगी…) आणि छोटा टिझर सोशल मीडियावर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली. आता चित्रपटातील धमाकेदार ट्रेलर (Bholaa Trailer) चाहत्याच्या भेटीस आला आहे. या चित्रपटातील अजयच्या अॅक्सन सीन पाहून चाहत्यांनी त्याचे भरूभरून कौतुक केलं आहे.

अभिनेता अजय देवगणने त्याच्या इन्स्टाग्रामवर आगामी 'भोला' चित्रपटातील २.३३ मिनिटांचा धमाकेदार ट्रेलर (Bholaa Trailer) रिलीज केला आहे. या ट्रेलरमध्ये पहिल्यांदा तब्बू एका गुप्त रस्त्याची माहिती देत तेथून निघून जाण्यास सांगताना दिसते. तर अजयला ती थोडी धमकावतानाही दिसते. याशिवाय ट्रेलरमध्ये धमाकेदार अॅक्सन सीन, फायटिंग, जाळपोळ, ट्रक, पोलिस वाहन, अस्थाव्यस्थ पोलिस स्टेशन आणि त्रिशूल यासारख्या अनेक गोष्टी दिसत आहेत. चित्रपटात तब्बूने एका पोलिस अधिकाऱ्याची मुख्य भूमिका साकारली आहे. ट्रेलरमध्ये तब्बूच्या हाताला गोळी लागल्याचे समजते, मात्र, ती अजिबात घाबरताना दिसत नाही.

या ट्रेलरच्या कॅप्शनमध्ये अजयने 'लढाई धैर्याने जिंकली जाते, तर संख्याबळ, शक्ती आणि शस्त्रांनी नाही'. असे लिहिले आहे. यातील खास करून ट्रेलरच्या बॅकग्राऊडला वाजणाऱ्याने म्युझिक केजीएफ फेम रवी बसरूर यांनी दिले आहे. हा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज होताच चाहत्यांच्या पंसतीस उतरला आहे. या चित्रपटात अजय आणि तब्बूशिवाय संजय मिश्रा आणि दिपक डोबरियाल यांनीही भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट तमिळ 'कैथी' चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. धमाकेदार ट्रेलरनंतर चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news