janhvi kapoor
janhvi kapoor

Janhvi Kapoor : जान्हवी पुन्हा शिखरला डेट करतेय

Published on

पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री जान्हवी कपूर शिखर पहारियाबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. दोघेही आधी रिलेशनशिपमध्ये होते; पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले होते. पण गेल्या काही महिन्यांत जान्हवी आणि शिखर अनेक ठिकाणी स्पॉट झाले आहेत. जान्हवी पुन्हा एक्स बॉयफ्रेंड शिखरला डेट करत असल्याचे बोलले जात आहे.

अशातच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये जान्हवीबरोबर बोनी कपूर आणि शिखर दिसत आहेत. त्यामुळे हे सर्व जण एकत्र फिरायला गेल्याची चर्चा आहे. आधी जान्हवी, नंतर बोनी कपूर आणि त्यांच्यापाठोपाठ शिखर दिसला. त्यामुळे जान्हवी शिखरला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, जान्हवी आणि शिखर २०१६ मध्ये डेट करत होते; पण श्रीदेवींच्या नो डेटिंग क्लॉजमुळे या दोघांना त्यावेळी वेगळे व्हावे लागले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news