Sidhu MooseWala : आम्ही सलमानलाही सोडले नाही तर…; सिद्धू मूसेवालाच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी | पुढारी

Sidhu MooseWala : आम्ही सलमानलाही सोडले नाही तर...; सिद्धू मूसेवालाच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला ( Sidhu MooseWala ) याच्या हत्येनंतर आता त्याच्या वडील बलकौर सिंह यांना जीवे मारण्याची धमकी ईमेलद्वारे मिळाली आहे. धमकीच्या ईमेलमध्ये ‘बॉलिवूड अभिनेता सलमान खानलाही सोडले नाही तर…’ असेही उल्लेख करण्यात आला आहे. धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून, हा धमकीचा ईमेल राजस्थानमधून आल्याचे सांगण्यात येत आहे. याआधीही त्यांना धमक्या दिल्या मिळाल्‍या आहेत.

गायक सिद्धू मूसेवालाचा ( Sidhu MooseWala ) गेल्या वर्षी २०२२ मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यानंतर सिद्धूच्या वडीलांनी जावे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. सिद्धूच्या वडिलांना धमकी देणाऱ्या ईमेलमध्ये म्‍हटले आहे की, “जर तुम्ही लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेणे बंद केलं नाही तर याचे खूपच भंयकर परिणाम होतील. यासाठी २५ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यातयेत आहे. अभिनेता सलमान खानलाही आम्ही सोडले नाही तर तू काय आहेस. सलमान खानवरही आम्ही नजर ठेवली होती.”

धमकीच्या ई मेल मिळताच बलकौर सिंह यांनी पोलिसांत धाव घेतली. त्‍यांनी दिलेल्‍या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ईमेल राजस्थानमधून आला असून तेथे चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे. त्या भागातील काही ठिकाणी छापे टाकून चौकशी करण्यात येत आहे.

सिद्धू मुसेवाला यांची २९ मे २०२२ रोजी पंजाबमधील मानसा येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बलकौर सिंग यांनी अलीकडेच वाढत्या उष्णतेमुळे मुलाची पुण्यतिथी वेळेआधी १९ मार्च रोजी मानसा येथे साजरी करण्याची घोषणा केली आहे. या पुण्यतिथीला मोठ्या संख्येने नागरिक पोहोचणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : 

Back to top button