Deepika Padukone : उन्हाळ्यात जॅकेट कोण घालतं?; दीपिका पादुकोण ट्रोल (video) | पुढारी

Deepika Padukone : उन्हाळ्यात जॅकेट कोण घालतं?; दीपिका पादुकोण ट्रोल (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री दीपिका पादुकोण ( Deepika Padukone )  सध्या चित्रपटामुळे नव्‍हे तर तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत आली आहे. तिचा विमानतळावरील एक व्हिडीओ समोर आला असून, तिच्या लूकवर सोशल मीडियावर कॉमेन्टसचा पाऊस पडत आहे. यात एका युजर्सने तिला ‘उन्हाळ्यात जॅकेट कोण घालतं?’ असं म्हणत ट्रोल केलं आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोण ( Deepika Padukone ) नुकतेच मुंबईच्या विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी तिने टी-शर्ट आणि ब्ल्यू जीन्सवर गडद चॉकलेटी रंगाचे जॅकेट परिधान केलं होते. मोकळे केस, खाद्यांवर ब्लॅक कलरची पर्स आणि डोळ्यावर चष्मा परिधान करून तिने तिचा लूक पूर्ण केलाय. व्‍हिडीओमध्‍ये दीपिका आलिशान गाडीतून खाली उतरते आणि विमानतळ्याच्या दिशेने जाताना दिसते. यावेळी तिने तिच्या खास शैलीत पॉपाराझीच्या कॅमेऱ्याला पोझ दिली. तिचा हा व्हिडिओ रात्रीच्या वेळचा असून विरल भयानी इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओतील दीपिकाचा लूक सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने ‘रात्रीच्यावेळी कोण चष्मा घालत का?’, ‘कडक उन्हाळ्यात कोण जॅकेट घालतं काय?’. तर दुसऱ्या एका युजर्सने ‘दीपिकाचे जॅकेट तिच्या वडिलांचे आहे काय?’, ‘रणबीरसोबत राहून त्याच्यासारखी फॅशन करत आहे?’, ‘मुंबईत जोरदार थंडी आहे काय?’. यासारखे अनेक प्रश्न विचारले आहेत. याशिवाय नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केलं आहे.

हेही वाचा : 

(video : viralbhayani instgram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button