Ira Khan : आमिर खानच्या मुलीचा आईवर प्रेमाचा वर्षाव, ‘इन्स्टा’वर आईसोबतचा फोटो केला शेअर | पुढारी

Ira Khan : आमिर खानच्या मुलीचा आईवर प्रेमाचा वर्षाव, 'इन्स्टा'वर आईसोबतचा फोटो केला शेअर

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता आमिर खान त्याच्या चित्रपटांतील अभिनयासोबत वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. काही दिवसापूर्वी आमिर आणि त्याची मुलगी इरा खान ( Ira Khan ) एका कार्यक्रमात स्पॉट झाले, वडील- मुलगी दोघांच्या बॉन्डिंगबद्दलच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या. इरा पती नुपूर शिखरेसोबत तर कधी बिकिनीतील फोटो शेअर केल्याने ट्रोल झाली आहे. यादरम्यान इरा तिच्या आईसोबतच्या फोटोनं पुन्हा चर्चेत आली आहे.

आमिरची मुलगी इरा खानने ( Ira Khan ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर स्वत: चा आणि आई रीना दत्तासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत इराने व्हाईट रंगाच्या जॅकेटवर डेनिम तर रीनाने गुलाबी रंगाच्या साडीत दिसत आहे. यावेळी खास करून इराने आईच्या कपाळावर किस करून प्रेमाचा वर्षाव केला. याशिवाय या फोटोत डिनर टेबलवर काचेचा ग्लास, प्लेट, मोबाईल, चष्माचा बॉक्स आणि इतर काही बंगल्यातील फर्निचर दिसत आहेत.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘Love you, mama 🥰,♡ Princess of the queen,I love my mother because trees love water and sunlight. It helps me grow, develop and reach great heights.’ असे लिहिले आहे. इरा आणि रीना दत्ता यांचा फोटोवर चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. दोघींचा हा फोटो खूपच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि रीना दत्ता यांचा लग्न १९८६ मध्ये झाले होते. मात्र, काही कारणास्तव दोघेजण २००२ मध्ये विभक्त झाले होते. आमिर आणि रीना दत्ता यांना दोन मुले असून मुलाचे नाव जुनैद आणि मुलीचे नाव इरा खान असे आहे. इरा नकुतीच नुपूर शिखरसोबत विवाह बंधनात अडकली आहे.

हेही वाचा : 

Back to top button